कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण... सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटल पाच ते सात दिवसांसाठी बंद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 30 April 2020

कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण... सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटल पाच ते सात दिवसांसाठी बंद


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन, सोलापूर- अश्विनी सहकारी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून काही जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे. रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छतेसाठी आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी दिली.

अश्विनी हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे दक्षता घेऊन सुद्धा दाखल झालेल्या रुग्णांमुळे व त्यांच्या संपर्कामुळे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.आरोग्यसेवेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण सुरक्षा आणि दक्षतेसाठी  संपूर्ण हॉस्पिटल बंद ठेवून सर्व विभागांची स्वच्छता व सॅनिटेशन करून घेणे आवश्यक असल्याने हॉस्पिटल बंद ठेवण्यात येत असल्याची माहितीही डॉ. घुली यांनी दिली. 

बाधित कर्मचाऱ्यांची व्यवस्था सिव्हील हॉस्पिटल, महापालिका आरोग्यसेवा यांच्या मदतीने केली असून काही जणाना हॉस्पिटलमध्ये आणि काही जणाना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले असल्याचेही डॉक्टर घुली यांनी सांगितले.
रुग्णालयात सध्या 26 रुग्ण असून यातील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहे तर काही रुग्णांना इतर ठिकाणी शिफ्ट केले जाणार आहे. रुग्णालयात नवजात शिशु व प्रसूती झालेल्या महिलांची संख्या अधिक आहे. रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णालयात येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्यासह सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण व अंतर्गत स्वच्छता केली जात आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधित विभागप्रमुखांना याबाबतची कल्पना देण्यात आली असल्याचेही डॉ. घुली यांनी सांगितले. अश्विनी रुग्णालय लवकरात लवकर पुन्हा सेवेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

add