पेच सुटण्याची शक्यता... ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला राज्यपाल लवकरच मान्यता देणार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 29 April 2020

पेच सुटण्याची शक्यता... ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला राज्यपाल लवकरच मान्यता देणार

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातुन विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नेमणूक होण्यावरून निर्माण झालेला पेच लवकरच सुटण्याची शक्यता असून ठाकरे यांच्या नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच मान्यता देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण ही घोषणा कधी होईल, याबद्दलची तारीख याबद्दल काही माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच राज्यपाल कोठ्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान काल संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर सदस्य म्हणून तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. 

राज्यपालांनी या वेळी आडवळणाने उद्धव यांची नियुक्ती करणे कसे अवघड असल्याचे सांगितले होते. याबाबतीत राज्याचे ॲडव्होकेट जनरल आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडे विचारणा करावी लागेल आणि सरकारचा हा प्रस्ताव निकषात बसतो की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले आहे.

add