धारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 7 April 2020

धारदार शस्त्राने वार करत भावानेच केला भावाच्या हत्येचा प्रयत्न... पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घटना


पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर तालुक्यातील विटे येथे भावानेच भावाच्या पोटावर धाारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जखमी इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोटात वार करणा-या भावाच्या आणि त्यास मदत करणा-या त्याच्या पत्नीच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

यासंदर्भात तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार  दिनांक 06 /4/ 2020 रोजी दुपारी 17:30 वा.चे सुमारास विटे, ता. पंढरपूर येथे यातील फिर्यादी रवींद्र शरद काळे वय 40 वर्ष हे त्यांचे घरासमोर रस्ता करत असताना यातील आरोपी  समाधान काळे व  त्याची पत्नी प्रांजली उर्फ बाई (रा. विटे) हे दोघे जण येऊन फिर्यादी ची बहिण सुवर्णा काळे हीस शिवीगाळ करू लागले म्हणून फिर्यादी हे त्यांना तुम्ही येथे शिवीगाळ करू नका येथून जावा म्हणाले चे कारणावरून फिर्यादीची भावजय प्रांजली हिने त्यांना पाठीमागून धरले व समाधान याने त्याच्या जवळील बर्ची काढून फिर्यादीस तू सुवर्णाची बाजू घेऊन आमचे बरोबर भांडण करतो काय तुला जीवेच मारतो, तुला ठेवत नाही असे म्हणून फिर्यादीचे पोटावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला

यासंदर्भात -दि6/04/2020 रोजी 22/48 वाजता पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींविरुध्द भा.द.वि कलम 307,323,504,506,34प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे करत आहेत

add