लॉकडाऊनच्या काळातही चोरटे सक्रीय.... पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील अनेक दुकाने भल्या पहाटे फोडली - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 28 April 2020

लॉकडाऊनच्या काळातही चोरटे सक्रीय.... पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील अनेक दुकाने भल्या पहाटे फोडली


पंढरपूर ता: तिसंगी- 27/ 4 /2020 रोजी .पहाटे तिसंगी अहिल्या चौकात असणारी पत्राशेड पाच ते सहा दुकाने राँडणे, कटरने उचकटून श्री औदुंबर पाटील किराणा मालाचे दुकान .अभिजीत माळवे शेती अवजारे दुकान, वैभव रुपनर मेडिकल ,विनायक हेगडे पेंड पशुखाद्याचे दुकान, मुस्तफा मुलाणी पंम्पचर चे दुकान. ही दुकाने फोडण्यात आली. लाँकडाऊनचा फायदा घेत चोरट्याने पहाटेच्या गार झोपेत हा मोठा दणका तिसंगी मध्ये दिला.

यावेळी पंचनामा करत असताना पंढरपूर ग्रामीणचे पी एस आय -उमाप साहेब ,ए एस आय-आटपाडकर. कॉन्स्टेबल माने व तिसंगीचे उपसरपंच- गोरख पाटील, पोलीस पाटील- स्वप्नील लोखंडे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा पंचनामा करण्यात आला,. पुढिल तपास Asi -आटपाडकर करत आहेत.

add