तातडीच्या प्रवासासाठी.... महाराष्ट्र पोलिसांकडून विभागनिहाय पासेस मिळवण्यासाठी लिंक - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 28 April 2020

तातडीच्या प्रवासासाठी.... महाराष्ट्र पोलिसांकडून विभागनिहाय पासेस मिळवण्यासाठी लिंक


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाच्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशासह संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे.  यामुळे  अपरिहार्य कारणास्तव प्रवास करावा लागल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. अपुऱ्या कागदपत्रांवर प्रवास केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे.

ही गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून विभागनिहाय पासेस मिळवण्यासाठी लिंक शेअर केल्या आहेत. आपल्याला प्रवास करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून पास मिळवता येऊ शकतो. यामध्ये राज्याच्या बाहेर प्रवास करायचा असल्यास तसेच राज्यामध्ये प्रवास करायचा असल्यास पासची सोय करण्यात आली आहे.

तसेच मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित आणि पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित प्रवास तातडीचा प्रवास करायचा असल्यास आपल्याला स्वतंत्रपणे नोंद करावी लागेल. त्यासाठी वेबसाईट लिंक शेअर केल्या आहेत. त्या वेबसाईटला भेट देऊन आपल्याला ज्या भागात प्रवास करायचा आहे ते निवडून अर्ज करावा लागेल.

विभागनिहाय  अर्ज करण्यासाठी....
राज्याच्या बाहेर प्रवास करायचा असल्यास- महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालय
http://mahapolice.gov.in/files/Headline/40.pdf

केवळ राज्यामध्येच प्रवास करायचा असल्यास
http://covid19epass.mahapolice.gov.in/

मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित प्रवास करायचा असल्यास
https://mumbaipolice.gov.in/ApplicationforEmergencyTravel

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित प्रवास करायचा असल्यास
https://covid19.mhpolice.in

वरील सगळ्या वेब आयडी गुगलवर टाईप करून सर्च कराव्यात.

add