Video- यात्रा-जत्रा-सण-उत्सवास बंदीच.... उल्लंघण करणारांवर कडक कारवाई करणार.... आपल्या परिसरात बाहेरगावचे कोणीही आले तर याची माहिती पोलीसांना द्या- सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 26 April 2020

Video- यात्रा-जत्रा-सण-उत्सवास बंदीच.... उल्लंघण करणारांवर कडक कारवाई करणार.... आपल्या परिसरात बाहेरगावचे कोणीही आले तर याची माहिती पोलीसांना द्या- सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटीलPandharpur Live- कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, बाहेरुन आलेल्या लोकांमुळेच सोलापूरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाहेरुन कुणीही जिल्ह्यात येवु नये याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, बाहेर गावाहून आपल्या गावात, शहरात, परिसरात कोणीही आले तर याची माहिती पोलीसांना अवश्य द्या. 

यात्रा-जत्रा-सण-उत्सवास बंदीच आहे, तरीही एका गावात यात्रा साजरी करताना कांही ग्रामस्थ आढुन आले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कोणीही यात्रा, सण, उत्सव साजरे करु नये. याची काटेकोरणे अंमलबजावणी करावी, अन्यथा कायद्याचं उल्लंघण करणारांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

add