पंढरपूर शहर पोलीसांच्या सुरक्षेसाठी कोळी महासंघाकडून सेफ्टी हँड ग्लोजचे वाटप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 3 April 2020

पंढरपूर शहर पोलीसांच्या सुरक्षेसाठी कोळी महासंघाकडून सेफ्टी हँड ग्लोजचे वाटप

Pandharpur Live-   सध्या सर्वत्र कोरोना विषाणुमुळे भीतीचे सावट आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झालीय. या काळात राज्यभरातील पोलीस बांधव आपले कर्तव्य चोख बजावताना आढळुन येत आहेत. पोलीस बांधवांच्या जेवणाची, नाष्ट्याची सोय अनेक समाजसेवक करताना आढळुन येत आहेत. कांही संस्थांनी पोलीसांसाठी सॅनेटायझर्सचेही वाटप केले आहे. आज कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी पंढरपूर शहर पोलीसांसाठी सेप्टी हॅन्ड ग्लोजचे वाटप करुन पोलीस बांधवांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 कोरोना विषाणू या रोगाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य करत असताना आरोग्य चांगले सांभाळता यावे तसेच या आजारापासून संसर्ग होऊ नये याकरिता हे सेफ्टी हॅन्ड ग्लोजचे वाटप उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.श्री.सागर कवडे सो, पोनि श्री.अरुण पवार ,पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे हस्ते करण्यात आले.
   
          याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.श्री.सागर कवडे सो, पोनि श्री.अरुण पवार, पंढरपूर शहर पोलीस ठाणे, तसेच पोलीस ठाणे कडील इतर पोलीस  अधिकारी,पोलीस कर्मचारी व कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

add