बॉलीवुडच्या आणखी एका लखलखत्या ता-याची जगातुन एक्झीट.... अभिनेते ऋषी कपुर यांचे निधन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 30 April 2020

बॉलीवुडच्या आणखी एका लखलखत्या ता-याची जगातुन एक्झीट.... अभिनेते ऋषी कपुर यांचे निधन

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कालच अभिनेता इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला... यानंतर आज पुन्हा एका लखलखत्या ता-याने जगातुन दुःखद एक्झीट घेतली आहे.... 29 एप्रिलला अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. याच्या दुसऱ्या दिवशीच 30 एप्रिलला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडने एकापाठोपाठ एक दोन दिग्गज अभिनेत्यांना गमावले आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला हा मोठा धक्का आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कला जगतावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर सेलेब्स आणि चाहते त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. हिंदी सिनेमांमध्ये ऋषी कपूर यांचे मोठे योगदान होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते.

 ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. 

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. 'मेरा नाम जोकर' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'बॉबी', 'दामिनी','दो दुनी चार', 'कर्ज', 'प्रेमरोग', 'चांदनी' या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

add