संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 3 April 2020

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी उगारला दंडुका... कासेगावात पकडला 31 हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ...

तालुक्यातील अनेकांवर विविध गुन्हे दाखल
 पंढरपूर लाईव्ह- राज्यात संचारबंदी लागू असतानाही या संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या अनेकांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी दंडुका उगारल्याचे आढळुन आले आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संचारबंदीचं उल्लंघण करणार्‍या अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आज कासेगाव येथुन अवैधरित्या साठवलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ असा 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण आवचर यांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक बसलेला आढळुन येत आहे.
  
दुचाकीवरून फिरणार्‍या चार जणांवर कलम 188 प्रमाणे संचारबंदी उल्लंघनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये 1.कमलाकर दिनकर गोफणे(देगाव ता.पंढरपूर),2.महेश कुबेर पवार (शिरभावी ता.सांगोला),3.धनाजी शंकर भातुगडे(शिरभावी ता.सांगोला) अन्य एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही जुगार(तीन पानी तिरट)खेळताना 6000 रुपयांच्या मुद्देमालासह कोंढारकी ता.पंढरपूर येथे 1.जालिंदर विष्णू थिटे(रा.अनगर ता.मोहोळ),2.बापू भास्कर दांडगे, (कोंढारकी),3.मच्छीन्द्र ताड(एकलासपूर ता.पंढरपूर),4.रवींद्र शंकर दांडगे (कोंढारकी),5.शिवाजी सोपान पाटील (कोंढारकी) व 6.अनिल कापसे (कोंढारकी) यांच्यावर  तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ पकडून कलम 188 व जुगार प्रतिबंधक कायदा व साथीचा रोग प्रतिबंधक कायद्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच बंदी असतानाही गुटखा साठवण केल्याप्रकरणी बंडू हणमंत लवटे व सोमनाथ पोपट लवटे(रा.निजामपूर ता.सांगोला) या दोघांच्या विरोधात बंदी असतानाही गुटखा वाहतूक व साठवणूक केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिनियम व संचारबंदी उल्लंघन  कलम 188, 272,273 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असताना 31025 रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ आढळुन आल्याने दादा विठ्ठल ढोणे, सूरज केरबा पडवळकर दोघे रा. कासेगाव, ता. पंढरपूर यांच्यासह मुद्देमाल ताब्यात घेतला असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण आवचर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

add