पुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 2 April 2020

पुणे विभागात आज सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण... स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनातर्फे ९७ तर साखर कारखान्यामार्फत ५४२ कॅम्प सुरू -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसकर

पंढरपूर Live - 1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 02/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सद्यस्थिती ) रोजी एकूण 3 ने वाढ झाली असून  विभागातील एकूण रुग्ण संख्या 80 झाली आहे. ( पुणे -39, पिंपरी चिंचवड 12, सातारा  2, सांगली 25 आणि कोल्हापूर 2). तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1839 होते. त्यापैकी  1663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 176 चे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालां पैकी 1544 नमुने निगेटीव्ह आहेत व 80 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 8119 प्रवाशांपैकी 4214 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून 3905 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 10 लक्ष 79 हजार 111 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 48 लक्ष 72 हजार 779 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 441 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.


2) सह आयुक्त,अन्न व औषध प्रशासन यांचेकडील माहीतीनुसार विभागात 1438 PPE (Personal Protective Equipment), N 95 Mask 19639  व 2 ply & 3 ply चे 206576 इतके mask उपलब्ध आहेत. तसेच 30  ml to  500 ml Sanitizer 115968 एवढे उपलब्ध आहेत.

3) विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा –
• पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 17,939.376 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे.
• पुणे विभागात अंत्योदय (AAY)  व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजना अंतर्गत 27,08,711 शिधापत्रिका / कुटुंबापैकी दि. 02.04.2020 रोजी सकाळच्या सत्रात 2,10,208 कुटुंबांना गहू,साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदूळ चे 52,916.84 क्विंटल इतके वितरण करण्यात आले आहे.

• मार्केट मध्ये विभागात एकूण 18666 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 15188 क्विंटल, फळांची  3261 क्विंटल  तसेच कांदा/ बटाट्याची 16389  क्विंटल इतकी आवक झाली आहे
विभागात  दि.01/04/2020 रोजी 85.13 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.44 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे.

 उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे. तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधित जिल्ह्यातील खालील अधिका-यांशी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे जिल्हा :-  1) श्री.भानूदास गायकवाड,‍ जिल्हा पुरवठा अधिकारी – 020-26061013
             2) श्रीमती अस्मीता मोरे,अन्नधान्यवितरण अधिकारी – 020-26123743
सातारा जिल्हा:-1) श्रीमती स्नेहल किसवे,‍ जिल्हा पुरवठा  अधिकारी –  02162-234840
सांगली जिल्हा:- 1) श्रीमती वसुंधरा बारवे,‍ जिल्हा पुरवठा  अधिकारी –  0233-2600512
कोल्हापूर जिल्हा :-1) श्री.दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा  अधिकारी – 0231-265579
सोलापूर जिल्हा :-1) श्री.उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा  अधिकारी –  0217-2731003/8

4) पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना आवाहन :- पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, आपण कोरोना सदृश्य परिस्थितीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत व आपल्या दवाखान्याकडे येणा-या रुग्णांना (SARI) सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यन्वित करण्यात आले असून येथे पाठविण्याची व्यवस्था करावी. संपर्क दूरध्वनी क्रमांक 020-25818323 डॉ.स्वाती बढीये (निवासी वैदयकीय अधिकारी, कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी ) 8806668747.
याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खाजगी दवाखान्यांमध्ये जर कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला तर अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल अथवा भोसरी येथील नुतन भोसरी हॉस्पीटलमध्ये (कोरोना बाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असलेले) दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-67331307.

5) स्थलांतरीताकरीता तयार करण्यात आलेले रीलीफ कॅम्प :‍   विभागामध्ये    जिल्हा प्रशासनमार्फत  97 व साखर कारखान्यामार्फत 446 असे एकुण 543 रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये   एकुण 26472   स्थलांतरीत मजूर असून एकुण 85148 मजूरांना जेवण देण्यात येत आहे.

6) कृषि उत्पन्न बाजार समित्या निर्विघ्नपणे सुरू रहाण्यासाठी पोलीस विभागाकडून डिजिटल पासेस मिळेपर्यंत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आडते व कामगार यांना दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश देण्यात यावा व कृषी उत्पन्न बाजार समितीस योग्य तो पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी पोलीस विभागास केल्या आहेत.

add