पुणे महानगरक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांवर 19 हॉस्पीटलमध्ये उपचार -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 28 April 2020

पुणे महानगरक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांवर 19 हॉस्पीटलमध्ये उपचार -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


      पुणे दि.28:- पुणे महानगरक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांवर 19 हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
             डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळया 19 शासकीय व खाजगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
   पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कांही खाजगी हॉस्पीटलबरोबर कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याबाबत करार केलेला आहे.
  तसेच  राज्य शासन याबाबत धोरणात्मक निर्णय घेत असून  खर्चाची प्रतिपूर्ती कशी करावी, याअनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक तत्वे अपेक्षित आहे; तथापि, तोपर्यत वेगवेगळया हॉस्पीटलच्या सेवा प्राप्त करून घेण्यात येत आहेत आणि या सेवांच्यामार्फत कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
     कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूतीसाठी ससून हॉस्पीटल व महानगरपालिकेचे सोनवणे हॉस्पीटल या दोन  हॉस्पीटलमध्ये व्यवस्था करण्यात आली असून या शिवाय कांही खाजगी हॉस्पीटलशी महापालिका करार करीत आहे. हे  दोन हॉस्पीटल वगळता ज्या महिला कोरोनाबाधित नाहीत, त्यांच्या प्रसूतीची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.. 

add