पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड हिचा ऑनलाईन महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 27 April 2020

पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड हिचा ऑनलाईन महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग


○ सांगा कसं जगायचं, कन्हत कन्हत की गाण म्हणत या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेत ऑनलाईन सहभाग


पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेली कु. उमा सिताराम गायकवाड हिने कै. शिवाजीराव नागवडे यांच्या स्मरणार्थ "ऑनलाईन महाराष्ट्राचा महावक्ता" अशी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली  होती. या स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. उमा गायकवाड हिने सहभाग नोंदविला आहे.
    सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशा वेळी आपल्या स्वतःच्या अंगभुत असलेली कला उमा गायकवाड यांनी घरी राहुन जोपासली असल्याचे दिसुन येत आहेत.
     वक्तृत्व परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित सहकारमहर्षी कै. शिवाजीराव नागवडे (बापू) यांच्या स्मरणार्थ ऑनलाईन "महाराष्ट्राचा महावक्ता" राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकुण १० विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. त्या पैकी पंढरपूर सिंहगडच्या कु. उमा गायकवाड हिने "सांगा कसं जगायचं..कन्हत कन्हत की गाणं म्हणत" या विषयावर ५ मिनिटांचा व्हिडिओ पाठविला आहे. सदर ५ मिनिटांचे व्हिडिओ हा ५ परीक्षकांकडून ८० मार्कांचे परिक्षण होणार आहे तर उर्वरित २० गुण हे व्हिडिओ लाईक वरून देण्यात येणार आहेत. सदर लाईक ह्या २६ एप्रिल ते २ मे २०२० या कालावधीतील लाईक ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
    लाॅकडाऊन च्या कालावधीत विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी घेता यावा. यासाठी ऑनलाईन महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कु. उमा गायकवाड हिने आपल्या घरी राहून इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना सुद्धा मराठी सारख्या भाषेत प्रभावी पणे वक्तृत्व शैलीत मांडणी करून अनेक तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केली आहेत.
    ऑनलाईन महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. राजश्री बाडगे, प्रा. अनिल निकम, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. समीर कटेकर,  आदी सह महाविद्यालयातील अनेक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

add