Corona Virus- आता कोरोना रूग्णांना घरबसल्या घेता येणार उपचार, जाणून घ्या अधिक माहिती... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 28 April 2020

Corona Virus- आता कोरोना रूग्णांना घरबसल्या घेता येणार उपचार, जाणून घ्या अधिक माहिती...


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- ज्यांना कोरोनाचे अगदी कमी किंवा ज्यांची कोरोना लक्षणं दिसायच्या आधीची स्टेज आहेत अशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली गेलीये. नवीन नियमावलीप्रमाणे अशा रुग्णांना आता घरातच आयसोलेशन म्हणजे अलगीकरणात ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नवीन नियमावलीनुसार डॉक्टरांकडून सदर रुग्णाचं निदान केलेलं असावं. कोरोना लक्षणांपूर्वीची स्थिती, कोरोनाची अगदी कमी लक्षणं, मध्यम आणि तीव्र स्वरूप अशा कोरोनाच्या स्टेजेस आहेत. यापैकी कोरोना लक्षणांपूर्वीची स्थिती, कोरोनाची अगदी कमी लक्षणं असणाऱ्यां रुग्णांना आता घरात आयसोलेशनमध्ये ठेवलं जाऊ शकतं.

मात्र घरातमध्ये अलगीकरणेचे नियम १०० टक्के पाळले जातील अशा सुविधा असायला हव्यात.
काय आहे नवीन नियमावली :
  • घरात ज्यांना अलगीकरणात राहायचं आहे अशाना घरीच अलगीकरणात ठेवण्यासाठी लागणारं 'सेल्फ आयसोलेशन' हमीपत्र भरणे बंधनकारक असेल
  • या बाबतीतीत आवश्यक नियमावली तंतोतंत पाळणे गरजेचे आहे
  • घरातच अलगीकरण ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तीची काळजी घेण्यास कुणीतरी घरात असावं.
  • ही व्यक्ती चोवीस तास रुग्णाच्या संपर्कात असायला हवी
  • या व्यक्तीने डॉक्टरांशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं देखील बंधनकारक असेल
  • घरात अलगीकरण केलेल्या रुग्णाला सर्व्हिलन्स अधिकाऱ्याकडून नियमित तपासणी करुन घेणे बंधनकारक
  • घरातच अलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीने प्रोटोकॉल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन घेणं बंधनकारक
मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अशात मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिक अत्यंत दाटीवाटीने राहतात. अशा ठिकाणी मात्र सेल्फ आयोसोलेशन हा पर्याय उपलब्ध नसणार आहे

add