जिल्ह्यात मनरेगाची 498 कामे सुरु- उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांची माहितीसोलापूर दि. 12 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ( मनरेगा ) योजने अंतर्गत जिल्ह्यात 498 कामे चालू असून या  कामावर 2982 मजूर काम करीत आहेत, अशी माहिती  रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी आज दिली.
 मागेल त्याला काम देणे हे मनरेगाचे मुळ उदिष्ट आहे. मनरेगा अंतर्गत रोजगार देण्याबाबत जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील  1033  ग्रामपंचायती मध्ये  21 हजार 354 कामे उपलब्ध आहेत.  जिल्हयात मनरेगा अंतर्गत मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. याचा ग्रामीण भागातील गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
त्यांनी सांगितले की, मनरेगांतर्गत एप्रिल पासून 238  रुपये प्रति दिवस मजुरी देण्यात येते. मजुरांनी ग्रामपंचायतीकडे रोजगाराची मागणी केल्यास कामे उपलब्ध करुन देण्यात येतील.  सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपातळीवरील सर्वच कर्मचाऱ्यांनी  मजुरांशी संपर्क साधुन आवश्यकतेनसार कामे चालु करुन मजुरांना रोजगार उलब्ध करून द्यावा. मजुरांना कामावर कामाचा आठवडा पूर्ण होताच आठ दिवसात मजूरी ऑन लाईन प्रणाली द्वारे बँक खात्यात जमा करावी. या योजने अतर्गत सिचन व जलसंधारण कामे प्राधान्याने करणबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचना आहेत.
या योजने अंतर्गत वैयक्तिक विहिरी, फळबाग लागवड गायी शेळयांचा गोठा शेततळे रेशीम, बांध बंधीस्ती व दुरुस्तीचे कामे केले जातात. या कामांत रोहयोचे जॉबकार्ड धारक मजुर व त्यांचे कुटुंब यांना रोजगार मिळतो. परिणामी संपूर्ण कुटुंबास रोजगार मिळतो व स्थायी मत्ता तयार होवून वैयक्तिक विकास व रोजगार साध्य होण्याचे वैशिष्टयसुध्दा यामध्ये आहे. ही योजना वैयक्तिक विकासासह गांव विकासाचे दृष्टीने अत्यंत महत्वाची असून मोठया प्रमाणात रोजगार क्षमता या योजनेत आहे. ज्यांना मनरेगा अंतर्गत काम करावयाचे असेल, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे काम मागणी करावी, असे श्री.  किशोर पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात 21354 कामांना तांत्रिक मान्यता
जिल्हयात खालील प्रमाणे कामांना तांत्रिक व प्रशाकीय मान्यता देऊन सेल्फ तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये वैयक्तिक विहिर-1875, घरकुल-6262, शोषखड्डे -6465 शौचालय- 468, रोप वाटीका-474, पाझर तलाव गाळ काढणे-36, गांडूळ खत-1130, नाडेप-1076, फळबाग-2135, रेशीम निर्मित्ती - 452, रस्ते 179, वृक्ष लागवड -212, विहिर पुर्नभरण- 1683, शेत तळे - 863,  कंपार्टमेंट बंडीग-336, इतर कामे-575.
जिल्ह्यात 498 कामांवर 2982 मजूर
 सोलापर जिल्हयामध्ये सुरू असलेली कामे पुढील प्रमाणे - वैयक्तिक विहिरी- 109, घरकुल- 324, शोषखड्डे- 5, फळबाग-9, रेशीम निर्मित्ती - 38, रस्ते -1, वृक्ष लागवड- 8, रोप वाटीका-3, अशी 498 कामे सुरु असून 2982  मजूर काम करीत आहेत.