ब्रेकींग... लॉकडाऊनचा कालावधी एक महिन्याने वाढला... जाणुन घ्या लॉकडाऊन 5 बद्दल - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Saturday, 30 May 2020

ब्रेकींग... लॉकडाऊनचा कालावधी एक महिन्याने वाढला... जाणुन घ्या लॉकडाऊन 5 बद्दल

Pandharpur Live Online- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारने आता लॉकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आता आणखी महिन्याभरासाठी वाढवण्यात आला आहे.
महत्वाचे मुद्दे
 1. केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ५ची घोषणा
 2. संपूर्ण देशभरात ३० जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर
 3. कन्टेंटमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम
 4. रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार
 5. राज्यांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत जुलैमध्ये निर्णय घेण्यात येणार
 6. ८ जून नंतर अटींसह धार्मिक स्थळांना खुल करण्याची परवानगी
 7. ८ जून नंतर अटींसह हॉटेल्स सुरू करण्याची मुभा, हॉटेलमध्ये एकावेळेस किती व्यक्तींना प्रवेश याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल
 8. मेट्रो सेवा, सिनेमागृह, जीमला तूर्तास बंदी कायम
 9. राजकीय, सामाजिक कार्यक्रमास तूर्तास निर्बंध
लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल.

३० जून २०२० पर्यंत कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे.
- कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन अधिक कठोर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल.
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
- आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
- हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
- शॉपिंग मॉल उघडणार.
दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
- शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.
तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या त्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.
- आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
- सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
- क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

देशात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या लॉकडाऊनची मर्यादा 1 जून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा लॉकडाऊन केवळ कंटेनमेंट झोनपुरताचं असणार आहे. अन्य ठिकाणी हळूहळू निर्बंध उठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने नियमावली दिलेली आहे. कार्यालय आणि कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यायची याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कार्यालयासाठी सर्वसाधारण नियम
 • कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी-अधिकारी आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक

 • हवा खेळती राहण्यासाठी दार-खिडक्या उघडी ठेवावी.

 • सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी असलेल्या मास्कचा वापर करणे बंधनकारक

 • तोंडाला आणि नाकाला सतत हात लावणे टाळावे

 • खोकला-सर्दी झालेली असेल तर टीश्यू पेपर, स्वच्छ धुतलेल्या रूमालाचा वापर करावा

 • कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखणे बंधनकारक

 • कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागत अर्थात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक

 • कार्यालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था

 • तसेच स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे बंधनकारक, स्वच्छतागृहाचा वापर केल्यास हात साबणाने धुणे बंधनकारक

 • लिफ्ट, बेल, बटन, टेबल-खुर्ची आणि इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ पुसून घ्यावीत

 • कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने पुसून घ्यावे

 • कार्यालय साबण व पाण्याने धुवून घेणे

 • या सर्व मार्गदर्शक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक.
अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सूचना
 • एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करू नये

 • ई-ऑफिसचा वापर जास्तीत जास्त करावा, ई-मेलवरून फाईल्स शक्यतो पाठवून द्याव्या

 • कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश द्यावा.

 • येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक

 • मिटींग्ज शक्यतो व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घ्याव्यात प्रत्यक्ष घेण्याचे टाळावे.

 • सदर काळामध्ये ऑफिसमध्ये बसून एकत्र डबा खाणे, किंवा एकत्र जमा होणे टाळावे.
कार्यालयात एखाद्यास संसर्ग झाल्यास
 • सदर व्यक्तीला 100 पेक्षा जास्त ताप असेल तर त्याला लगेच रूग्णालयात दाखल करावे.

 • अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबधित कर्मचाऱ्यांना 14 दिवस कार्यालयी प्रवेश देवू नये. त्याबाबत आरोग्य विभागाच्या आदेशाचे पालन करावे.

 • पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे जे 3 फूटापेक्षा कमी अंतरावरील आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत असतील तर त्यांचे हाय रिस्क मध्ये वर्गीकरण करावे.

 • तसेच तीन फुटाहून जास्त अंतराने संपर्कात आलेल्यांना लो रिस्कमध्ये वर्गीकरण करावे.

 • हाय रिस्क मध्ये गणना केलेल्या व्यक्तींची संस्थात्मक विलीगीकरणात रवानगी करावी.

Ad