सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 6625 नागरिकांना परवानगी


Pandharpur Live - l
        सोलापूर दि. 28 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 109  नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 6516  नागरिकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 6625  नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.
          राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

एक मे 2020 पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 97949 अर्ज प्राप्त  झाले असून 43019 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 5837 अर्जांना परवानगी नाकारली असून 15664 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने  प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 33449 अर्जांना परवानगी  दिली  गेली  होती  पण  त्यांची मुदत संपल्याचे  जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण  45860 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी  39542 जणांना परवानगी दिली आहे तर 6318 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुर्नवसन शाखेकडून परवानगी देण्याचे काम चालू आहे. आतापर्यत शहर व जिल्ह्यातून एकूण नऊ रेल्वे गाड्याद्वारे परराज्यातील 11232 नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले. जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हिाधिकारी मोहिनी चव्हाण, तहसिलदार अभिजित जाधव यांच्या पथकाकडून ई पास उपलब्ध करुन देण्यात येत आहे.