कोरोना व सारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींने केले 3085 कुटुंबाचे सर्वेक्षण - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 5 May 2020

कोरोना व सारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींने केले 3085 कुटुंबाचे सर्वेक्षणइंदापूर (प्रतिनिधी):- कोरोना व सारी या संक्रमणशील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर  इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींनी अंगणवाडी सेविकांसोबत मिळुन  शहरातील 3085 कुटुंबांचे सर्वेक्षण केेले असुन याचा अहवाल नगरपरिषदेकडे सुपूर्त केला आहे. याबरोबरच इंदापूर येथील पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्याचीही तपासणी करण्यात आली.

कोरोना व सारी या संक्रमणशील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर नगरपरिषद व उपजिल्हा रग्णालय, इंदापूर यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी तसेच अंगणवाडी सेविका समवेत मदतनीस यांनी इंदापूर नगरपरिषद हद्दीमधील 3085 कुटुंबांचे सर्वेक्षण केले  . या सर्वेक्षणामध्ये कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 22000 नागरिकांपैकी 22 व्यक्ती सर्दी, ताप खोकला सदृश्य विकाराने संक्रमीत आहेत तसेच मिळालेल्या माहितीनुसार 65 चे वर बी.पी., शुगर थायरॉईडस सारख्या विकारांनी ग्रस्त आहेत. सदर विविध विकारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची माहिती व मोबाईल नंबर इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केली आहे. अशी माहिती जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग, इंदापूर चे  अध्यक्ष जयवंत नायकुडे यांनी दिली आहे.  


add