केंद्र सरकारने राज्यात सरकार कुणाचे? याचा विचार न करता महाराष्ट्राला आर्थिक मदत द्यायला हवी- ना.अशोक चव्हाण - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 6 May 2020

केंद्र सरकारने राज्यात सरकार कुणाचे? याचा विचार न करता महाराष्ट्राला आर्थिक मदत द्यायला हवी- ना.अशोक चव्हाण


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाराष्ट्रा राज्यात सर्वात जास्त  कोरोना बाधीत रुग्ण आहेत, याचा विचार करुन  केंद्र सरकारने राज्याला मोठी आर्थिक मदत करायला हवी, राज्यात सरकार कुणाचे आहे? याचा विचार न करता महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहुन केंद्र सरकारने ही मदत द्यावी.  असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ताच्या एका विशेष कार्यक्रमात ते  बोलत होते.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


मोदी सरकारने टाळेबंदी लागू करताना देशाला त्याची पूर्वकल्पना द्यायला हवा होता. म्हणजे देशातल्या नागरिकांना वेळ मिळाला असता. अडकलेले लाखो नागरिक घरी पोचू शकले असते, असं म्हणत केंद्राने घाईघाईत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केल्याचं चव्हाण म्हणाले.

राज्यात रुग्णसंख्या अधिक असताना व उत्पन्न बंद असताना केंद्राने मोठी आर्थिक मदत व पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय सामग्री द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

केंद्राने चर्चा न करता अचानक निर्णय जाहीर केला. अडकलेल्या लाखो लोकांची दीर्घकाळ सोय करणं सोपं नसतं. एक ते दोन आठवडे उत्साह असतो उत्साहाच्या भरात ते शक्यदेखील होतं. मात्र आता अडकलेल्यांचे हाल होत आहेत. परराज्यातील मजुरांकडचे पैसे संपत आले, असं सांगत रेल्वेने त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागितले, ही गोष्ट नक्कीच चांगली नाही. आता काँग्रेसकडून त्यांना आता मदत केली जात आहे, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

add