पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या गोपाळपूरातील जिगरबाज भावंडांचा हृदय हेलावुन टाकणारा अपघाती मृत्यू... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 22 May 2020

पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या गोपाळपूरातील जिगरबाज भावंडांचा हृदय हेलावुन टाकणारा अपघाती मृत्यू...


पंढरपूर लाईव्ह - 
घरातील हलाखीची परिस्थिती... वडील पक्षाघाताच्या आजारामुळे अंथरूणाला खिळलेले... परंतु याही परिस्थितीत पोलीस व्हायचे स्वप्न उराशी बाळगून अथक परिश्रम करणारे, अभ्यासासोबतच नियमित व्यायाम करणारे गोपाळपूरातील दोन जिगरबाज भावंड व्यायामासाठी जात असतानाच एका गाडीने त्यांना धडक दिली आणि या अपघातात या दोन्ही भावंडांचा हृदय हेलावुन टाकणारा अपघाती मृत्यू झाला.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MARTया अपघाताची अधिक माहिती अशी की, गुरूवारी रात्री गोपाळपूर येथील व्यायामासाठी निघालेले विजय बाळु गुरव (22) व प्रथमेश बाळु गुरव (16) या सख्ख्या भावंडांना पिकअप (एम एच 42, ए क्यु 4923) ने धडक दिली.  या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपजिल्हा रूग्णालयात उपचार होत नसल्याने पुढील उपचारासाठी सोलापुरला नेत असतानाच वाटेत दोघांचीही प्राणज्योत मालवली.

add