पत्रकारासह आरोग्य कर्मचारी ,पोलीस बांधवांनी घेतला आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथिक गोळ्यांचा लाभ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 20 May 2020

पत्रकारासह आरोग्य कर्मचारी ,पोलीस बांधवांनी घेतला आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथिक गोळ्यांचा लाभPandharpur Live- 

पंढरपूर प्रतिनिधी: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील औषध विक्रेते व डॉ.संगीता पाटील ,अथर्व होमिओपॅथिक सेंटर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शनिवार दिनांक 16 मे सोमवार दिनांक 18 मे 2020 या कालावधीत करण्यात आली. यामध्ये 80 हुन अधिक पत्रकाराने सहभाग नोंदवला . या आरोग्य तपासणी मध्ये शरीरातील तापमान, शरीरातील रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण यांची तपासणी करण्यात आले. तसेच आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस वाटप करण्यात आले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MARTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्रालयाने होमिओपॅथिक गोळ्यांचा वापर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम- 30 या गोळ्या प्रभावी ठरु लागल्याने कोरोना बाधित शहरांमध्ये या गोळ्यांचा वापर सुरु झाला आहे. गेली दोन महिन्या पासून डॉ. संगीता पाटील यांनी पोलीस कर्मचारी ,नगरपालिकेतील कर्मचारी ,श्री उत्थाल रुख्मिनी मंदिर समितीतील कर्मचारी ,तसेच कोरोनाच्या या लढाईत पहिल्या फळीत काम करणाऱ्या सर्व वारीयर्स यांना या गोळ्याचे तपासणी करून मोफत वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज पर्यंत विविध विभागातील 1500 वारीयर्सने याचा लाभ घेतला आहे .असून जैनवाडी व चिंचोली या गावातील सर्व नागरिकांना तेथील सरपंच व समाज सेवक यांच्या मदतीने या गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोनो सारख्या भयंकर संसर्ग जन्य रोगांमूळे आपल्या जगावर संकंट ओढावलेले असल्यामूळे संपूर्ण भारताला व इतर जगाला याचा सामना करावा लागत आहे.किंबहूना आता खरे देव हे पोलीस,डाँक्टर, मेडिकल, लॅब व इतर अत्यावश्यक सेवावाले असून अहोरात्र झटून आपले कार्य करत आहेत... यांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे.यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून डाॅ.संगीता पाटील यांनी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप व तपासणी सुरू केली.

होमिओपॅथी ही एक सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे.त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या सहनशीलतेनुसार औषधांचा डोज ठरतो ,अर्धवट माहितीच्या आधारे घेतलेली औषधें ही रुग्णावर निश्चित परिणाम करतील याची खात्री नाही .होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हायेनमॅन यांनी त्यांच्या जीवन काळात अनेक साथीच्या आजारांवर होमिओपॅथी उपचार केले याचे अनेक पुरावे आहेत.


ज्या लोकांना रोगप्रतिकारक शक्तीसाठी होमिओपॅथी औषध घायचे आहे. त्यांनी योग्य होमिओपॅथी डॉकटरांचा सल्ला घेऊनच औषधे घ्यावी असा सल्ला डॉ पाटील यांनी सर्व नागरिकांना दिला असून प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आपल्या घरी राहून ही कोरोणाची लढाई आपल्याला लढायची आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


add