सरकोलीतील 'त्या' खुनाचा उलगडा करण्यात पोलीसांना यश... आरोपी गजाआड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 22 May 2020

सरकोलीतील 'त्या' खुनाचा उलगडा करण्यात पोलीसांना यश... आरोपी गजाआड


छायाचित्र- मयत संतोष कापणे
Pandharpur Live ll- 
पंढरपूर Live:-  सरकोली येथे झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असुन अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील 'तो' खुन आपणच केल्याची खळबळजनक कबुली पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीने दिली आहे. येथील संतोष सुरेश कपणे (वय 36 )याचा गुरुवारी रात्री खून करून आरोपी पसार झाला होता.या खुनातील  आरोपी  विनोद लक्ष्मण भोसले (वय 27) यास पोलिसांनी काही तासातच अटक केली. आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे.
               आरोपी विनोद भोसले हा अविवाहित आहे. तो कपने यांच्या शेजारीच राहत आहे. स्वतःच्या मालकीची जीप आसून जीपभाडे करून उदरनिर्वाह करीत आहे. मयत संतोष कपणे याने वर्षापूर्वी माझ्या पत्नीची तू बदनामी करतोस म्हणून ओझेवाडी येथील पठाण साहेब माळावर आरोपीस बोलवून घेऊन बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली होती. या मारहाणीचा राग  आरोपी विनोद भोसले याच्या मनात होता. 


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


               संतोष कपने हा दूध व्यवसाय करीत असून गुरुवारी सायंकाळी जेवण करून कामाचा कंटाळा आल्याने घरासमोरील कट्ट्यावर झोपला होता. आरोपी शेजारीच राहत असल्याने एकटा झोपलेल्या संतोष चा काटा काढायचा म्हणून परिस्थितीचा अंदाज घेतला रात्री एकच्या दरम्यान डोक्यात दगड घालून खून करून पसार झाला. दररोज दूध व्यवसायासाठी पहाटे उठणारा संतोष आणखी कसा उठेना म्हणून आई उठवण्यास गेली असता संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.  समोरचे चित्र पाहून आईओरडली असता घरातील व शेजारील लोक गोळा झाले.जिवंत असेल या आशेने त्यास पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले.


             वरील घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक किरण अवचार साहेब यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाची चक्रे फिरवली असता काही तासातच आरोपी विनोद भोसले यास अटक केली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.वरील घटनेने सरकोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

add