खळबळजनक... पंढरीत तरूणावर प्राणघातक हल्ला... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 10 May 2020

खळबळजनक... पंढरीत तरूणावर प्राणघातक हल्ला...
पंढरपूर लाईव्ह- आज दुपारी पंढरपूर मध्ये अज्ञात आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आज दि. 10-5-2020 रोजी दुपारी 12:30 वाजणेपूर्वी शंकर दत्तु शिंदे (वय 44), रा. सुलेमान चाळ, पंढरपूर  या तरूणावर अज्ञात आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद राजु दत्तु शिंदे (जखमी तरूणाचा भाऊ) यानी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MARTआरोपीनी उमा कॉलेजच्या पाठीमागे,  12 नंबर शाळेजवळील शौचालयाचे बाथरूममध्ये  शिंदे यास त्याचे डोक्यात, छातीवर सिमेंट काँक्रीटच्या दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिंदे हे जबर जखमी झाले. 

याबाबतच्या गुन्ह्याची नोंद पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये झाली असुन, अज्ञात आरोपीच्या विरूध्द भादवि 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील गंभीर जखमी असलेले शंकर दत्तु शिंदे यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आल्याचे समजते.   

add