छत्रपती शंभूराजे जयंती निमित्त पंढरीत रक्तदान शिबीर व जिवनावश्यक किटचे वाटप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 16 May 2020

छत्रपती शंभूराजे जयंती निमित्त पंढरीत रक्तदान शिबीर व जिवनावश्यक किटचे वाटप

Pandharpur Live- 
छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठाणचा उपक्रम
         छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पंढरीत छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोसले मित्रमंडळाच्या वतीने पंढरीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रक्तदात्यांना आणि गरजूंना जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वितरण करण्यात आले.या शिबीरात 186 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART


          छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते.यावर्षी कोरोनाच्या पाश्‍वभुमीवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले तसेच गरजूंना जिवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले.राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेेश टोपे यांनी रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले होते.त्यास प्रतिसाद देत हा उपक्रम आयोजीत करण्यात आल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष शेखर भारत भोसले यांनी दिली.या प्रसंगी गरजूंना चहा पावडर,साखर,रवा,पोहे,तूरडाळ,अंगाचा व कपड्याचा साबण,सॅनिटायझर,मास्क आदीं वस्तूंच्या कीटचे वितरण करण्यात आले.
  या कार्यक्रमस्थळी आ.भारत भालके,न.पा.मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले,पोलीस निरिक्षक अरुण पवार, प्रशासन अधिकारी सुनिल वाळूजकर,ऍड.दिनेश भोसले,मोहोळचे नायब तहसिलदार किशोर बडवे,डॉ.बी.के.धोत्रे आदींनी भेट देवून उपक्रमाची प्रशंसा केली.रक्तदान शिबीरासाठी रेवनिल ब्लड बँक सांगोला यांचे सहकार्य लाभले.  
     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप मांडवे,सागर कदम,गणेश भोसले,गणेश निंबाळकर,माऊली जगताप,सिध्दार्थ गुरव,ओंकार चव्हाण,संदेश ढेरे,आण्णा फुगारे,संकेत घोगरदरे,भैय्या फुगारे,प्रमोद शिरसट,अशिष सरवदे,अमित गवळी,अभिषेक कोकणे यांच्यासह रॉबिनहूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.       

add