पंढरपूरकर काळजी नको... 'त्या' 49 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 1 May 2020

पंढरपूरकर काळजी नको... 'त्या' 49 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  पंढरपूर करांना प्रतिक्षा असलेले त्या 49 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजते. यामुळे पंढरपूरकरांची काळजी कमी झाली आहे.  

पंढरपुरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेली मोहोळ तालुक्यातील पेनुर- पाटकुल येथील महिला कोरोना बाधित आढळली होती, या महिलेने 21 ते 24 एप्रिल दरम्यान पंढरपुरातील रुग्णालयात उपचार घेतला. त्या महिलेशेजारी या हॉस्पिटलमध्ये असलेल्या इतर लोकांची माहिती पोलिसांनी संकलित केल्यानंतर सदर महिलेच्या संपर्कातील 49 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आजपर्यंत काळजीत असलेल्या पंढरपूरकरांची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे.

उपजिल्हा रूग्णालयाच्या अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे आणि त्यांच्या टीमने 49 जणांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवले होते.  यांचे रिपोर्ट येईपर्यंत पंढरपूरकरांचा जीव टांगणीला लागला होता; परंतु  आता सर्वांचेच रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आल्याने पंढरपूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 


add