पंढरपूरकर चिंता वाढली.... काळजी घ्या... पंढरपूर तालुक्यातील रुग्ण संख्या वाढली... पंढरपूर शहर, उपरी, गोपाळपूर व करकंबमध्ये आढळले नवीन रुग्ण


Pandharpur Live - 
        कोरोनापासुन दुर असलेल्या पंढरपूर तालुक्यात सर्वप्रथम उपरी येथून कोरोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली. तेंव्हाच मोठ्या शहरातून व बाहेरगावाहून आलेल्या लोकांमुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील कोोरोना बाधीतांचा आकडा वाढणार असल्याची भीती निर्माण झाली होती. ही भीती आता खरी ठरतेय. आज पंढरपूर शहरात 2, उपरी येथे 1, गोपाळपूर येथे 1 व करकंब येथे 1 असे एकुण 5 नवीन रुग्ण आढळुन आले आहेत. यापैकी 4 रुग्ण मुंबईहून आलेले आहेत तर करकंब येथील रुग्ण पुण्याहून आला असल्याचे समजते. आता पंढरपूर तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 6 झाली आहे.
आज पंढरपूर शहरातील व गोपाळपूरमधील आढळुन आलेल्या रुग्णांना बाहेरगावाहून आल्याबरोबर (शासकीय क्वारंटाईन) विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते.  होम क्वारंटाईन केलेले नव्हते, त्यामुळे सदर रुग्णांचा जास्त जनसंपर्क आला नसल्याचे समजते. 
          प्रशासनाने सर्वांना क्वारंटाईन केले आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


         पंढरपूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या योग्य नियोजनामुळे आजतागायत कोरोनापासुन मुक्त असलेल्या पंढरपूर तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या कोरोना बाधीतांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे सुध्दा धोका वाढलेला आहे. पंढरपूर शहरामध्ये सर्व दुकाने खुली झाली आहेत. नागरिकांची गर्दी शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळुन येत आहे. त्यातच आता शहरातसुध्दा कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक बनले. 

पंढरपूर लाईव्हकडून नम्र आवाहन- नागरिकांनी शक्यतो आपापल्या घरातच राहावे, घरातील वयोवृध्दांची  व लहान मुलांची काळजी घ्यावी.