कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क... उपरीतील 3 किलोमीटरचा परिसर केला सिल

            पंढरपूर लाईव्ह :- 13 मे रोजी मुलुंड मुंबई येथून विनापरवाना उपरी , ता. पंढरपूर येथे आलेल्या 9 जणांना तलाठी रोहिणी पाटील, ग्रामसेवक बालाजी एलेवाड, पोलिस पाटील दत्तात्रय हेंबाडे, संग्राम नागणे यांनी  गावातील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन केले होते. यातील 55 वर्षीय इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या पंढरपूर तालुक्यात आज कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असुन प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिस, महसुल व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपरी गावात आले असुन पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करत आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ  बोधले  आदी सर्व प्रशासकीय अधिकारी उपरी गावात आले असुन सकाळी 11 वाजल्यापासुनच सर्व गाव बंद केले आहे. गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासुनचा 3 किलोमीटरचा संपुर्ण परिसर सिल करण्यात आला आहे. 

‘त्या’ रुग्णास जनकल्याणमध्ये अ‍ॅडमिट करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध!                              आज उपरी येथे आढळुन आलेल्या पंढरपूर तालुक्यातील पहिल्या कोरोना बाधीत रुग्णास जनजनकल्याण हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट करण्यास  स्थानिक नागरिकांनी  विरोध केला. दिपक वाडदेकर व कृष्णा वाघमारे यांनी स्थानिक लोकांची बाजु मांडत जनकल्याण हॉस्पिटल हे भर वस्तीत आहे. येथे कोणत्याही कोरोना बाधीत रुग्णास दाखल केल्यास स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविण्यात आली स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे अखेर प्रशासनाने  सदर रुग्णास उपचारासाठी  सोलापूरला हलवल्याचे समजते.