आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती द्या - जिल्हाधिकारी शंभरकर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 9 May 2020

आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती द्या - जिल्हाधिकारी शंभरकर


सोलापूर, दि. 8- आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. कुटुंबात, शेजारी किंवा परिसरात राहत असलेल्या आणि आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबाबत माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217-2731012 या क्रमांकावर देण्यात यावी, असे त्यांनी कळवले आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

त्यांनी सांगितले की, सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र वेळेत निदान आणि लगेच उपचार न झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत, असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्दी, ताप आणि श्वसनास त्रास होत असल्यास तत्काळ उपचार करून घ्यावेत अथवा निदान करुन घ्यावे. काही व्यक्ती वरीलप्रमाणे त्रास होत असूनही कुटुंबातील आजारी व्यक्तीस दवाखान्यात आणत नाहीत. व्यक्तींची तब्येत एकदम गंभीर बनल्यावर दवाखान्यात आणले जाते. यामुळे रुग्णांवर पुरेसा उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि रुग्ण दगावला जातो. 
घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

याबाबत सोलापूर महानगरपालिका घरोघरी सर्व्हेक्षण करीत आहे. मात्र त्यांनाही वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली जात नाही. परिणामी रुग्णांची संख्या रोखण्यास काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. यासाठी सोलापूरच्या नागरिकांचे सहकार्य आवश्क आहे.  सोलापूर शहरांतील सर्व नागरिक, खासगी वैद्यकीय व्यावसायिक , औषध दुकानदार, शेजारी, गल्ली, परिसरात ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्याचे माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षात संपर्क साधावा. अशा माहितीचा उपयोग संबंधित आजारी व्यक्तिस वेळेत परिणामकारक आणि वैद्यकीय सेवा देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.  

add