बाधितांवर उपचारासाठी खासगी दवाखाने ताब्यात घेणार... खासगी दवाखान्यातून रुग्ण सेवा द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 23 May 2020

बाधितांवर उपचारासाठी खासगी दवाखाने ताब्यात घेणार... खासगी दवाखान्यातून रुग्ण सेवा द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

Pandharpur Live ll- l
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
          सोलापूर, दि.२२-  कोरोना विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील दवाखाने ताब्यात घेण्यात येतील,  अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.         
          ज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काल  खासगी रुग्णालया संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार खासगी दवाखान्यातील रुग्ण्सेवेचा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी दवाखाने ताब्यात घेण्याचे अधिकार प्रशासनाला जिल्हा प्रदान करण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी शहर अथवा जिल्ह्यातील कोणतेही हॅास्पिटल उपचारासाठी ताब्यात घेऊ  शकतात. याबाबत सोलापूर शहरासाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

  
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MARTखासगी दवाखान्यातून रुग्ण सेवा द्या
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
   
       सोलापूर, दि. २२ :- सोलापूर जिल्ह्यातील  सर्व नोंदणीकृत खाजगी हॉस्पिटल, नर्सिंग होम, ओपीडी खाजगी मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक आणि आरोग्यविषयक खाजगी आस्थापना सुरू ठेवून वैद्यकीय सेवेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.   
     त्यांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांत सेवा सुरू ठेवावे. यासाठी कार्यवाही करीत असताना कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. खाजगी हॉस्पिटल नर्सिंग होममध्ये  रुग्णांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयातील दोन रुग्णांतील  अंतर तीन फुटांपेक्षा जास्त असावे. रुग्णालयात विषाणू संसर्ग संक्रमित होणार नाही याची विशेष काळजी घेऊन त्या प्रकारची व्यवस्था करावी. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओपीडी मध्ये रुग्णांचे विषयासंदर्भात प्रबोधन करण्यात यावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  सदरचे आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था संघटना  कलम 188 कायदेशीर कारवाईस पात्र असेल. अशा व्यक्ती व संस्था संघटना यांच्या विरुद्ध सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्याधिकारी सोलापुर महापालिका आणि जिल्ह्यातील ग्रामीण भाग व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात तालुका आरोग्य अधिकारी यांनी कारवाई करावी, असे शंभरकर यांन आदेशात नमूद केले आहे.

add