धक्कादायक... अखेर पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव... उपरी गावात आढळला कोरोना बाधीत रुग्ण - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 22 May 2020

धक्कादायक... अखेर पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव... उपरी गावात आढळला कोरोना बाधीत रुग्ण

पंढरपूर लाईव्ह - पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस  आली आहे.  परंतु प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान राखुन सदर रुग्णाचे एका शाळेत अलगीकरण केले. यामुळे सदर रुग्णाचा संपर्क वाढला नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर रुग्णास कोरोंटाईन केले असुन त्याचे संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MARTएवढे दिवस कोरोनापासुन दुर असलेला पंढरपूर तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असुन नागरिकांनी  अधिक खबरदारी घेणं अत्यावश्यक बनलं आहे. पुण्या-मुंबईकडून तालुक्यात येणार्‍या लोकांमुळे पंढरपूर तालुक्यात कोरोनाचे बाधीत रुग्ण आढळु शकतात अशी भीती व्यक्त होत होती; ती भीती आता खरी ठरली  आहे.

सध्या पंढरपूर शहरातील बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत. नागरिकांचा वावर शहरात वाढलेला आहे, यातच आता कोरोनामुक्त असलेल्या पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळुन आल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढु नये यासाठी प्रशासन करत असलेल्या अथक प्रयत्नाला खोडा बसेल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. 

आत्ता पंढरपूर तालुक्यातील जनतेनेच अधिक सतर्क राहणे व काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे. 

add