कोरोना मुक्तीचा कौतुकास्पद पंढरपूर पॅटर्न... कोराना मुक्तीसाठी तालुका प्रशासनाची पंचसुत्री - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 14 May 2020

कोरोना मुक्तीचा कौतुकास्पद पंढरपूर पॅटर्न... कोराना मुक्तीसाठी तालुका प्रशासनाची पंचसुत्री


           पंढरपूर  13- राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस  वाढ होत आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी  प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोलापूर  शहरात तसेच पंढरपूर तालुक्याच्या आजुबाजूला कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पंरतु  पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी तसेच समन्वय आणि नियमांचे काटेकोर पालनकरुन  ‘पंढरपूर पॅटर्न तयार केला आहे.  

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-


DVP MART


        पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यात प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी  केलेल्या काटेकोर नियोजनाला व प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी  गाव आणि वॉर्ड पातळीवर राबवलेल्या पंचसूत्रींमुळे पंढरपूर तालुका आतापर्यंत ‘कोरोना मुक्तराहिला आहे.
            कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली. तालुका प्रशासनाने  सुरवातीपासून नागरिकांना घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले. जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला घरपोच करण्याची व्यवस्था केली. शहरात व ग्रामीण भागात  मोकाट फिरणाऱ्या नागरीकांवर  पोलिसांनी कारवाई केली. तसेच शहरात व तालुक्यातील  गावांमध्ये विविध ठिकाणी निर्जंतुकिकरण केले.  घरोघरी वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर सारीची माहिती गोळा केली. तसेच घरोघरी थर्मल चाचणी केली. ज्यावेळस इतर शहरात रुग्ण वाढत होते त्यावेळेस तालुक्यातील प्रशासनाने या सर्व बाबी अतिशय तातडीने आणि नियोजनबध्द कार्यक्रम राबवून पूर्ण केल्या. शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला होता त्याला नागरिकांनी साथ देत पुर्णपणे यशस्वी झाला.
        कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण ग्रामस्तरीय समितीची स्थापना  करण्यात आली. या समितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका तसेच आशावर्कर यांचा समावेश करण्यात आला. या समितीकडून  बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली.  जीवनाश्यक वस्तु पुरवठा, आरोग्य सुविधा समितीमार्फत घरपोच देण्यात आल्या. अनेक ठिकाणी वस्तु खरेदीसाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करण्यात आला. त्यामुळे नागरीक आपोआप घरातच थांबले. तसेच तालुक्यातील सुमारे  70 गावांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुर्णपणे पाळला होता.
           संचारबंदीच्या कालावधीत पोलीस प्रशासनाने तालुका आणि शहरात येणारे रस्ते बंद केले. चेक नाके उभारून २४ तास तपासणी केली.  तसेच मॉर्निगवॉक करणारे नागरीक, विनाकारण फिरणारे नागरीक यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाइग्‍ करण्यात आली त्याचबरोबर  गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्याव्दारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. 
            नगरपालिकेमार्फत शहरात विविध  ठिकाणी फवारणी करुन निर्जंतुकीरण करण्यात आले.  शहातील प्रत्येक वार्डात वार्डस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली.  त्याव्दारे शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरीकांची माहिती वॉर्डस्तरीय समितीकडून संकलित करण्यात आली. शहरातील सुमारे 90 हजार नागरिकांचे आतापर्यंत थर्मल स्क्रींनिग करण्यात आले. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे 14 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले.
               कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असतानाच  ग्रामीण भागाचे अर्थकारण सुरळीत ठेवण्यासाठी गावांतील गरजा गावातच भागविण्यात येतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात जीवनाश्यक वस्तु, दुध, भाजी पाला, आरोग्य सुविधा सुरळीत राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.  
कोराना मुक्तीसाठी तालुका प्रशासनाची पंचसुत्री.
       पंढरपूर शहरातील व तालुक्यातील प्रत्येक नारिकांची आरोग्य तपासणी.
       परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची माहिती शहरातील  
        वॉर्डस्तरीय समितीकडून तर ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समितीकडून संकलित.
       परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे 14 दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक.
       तालुक्यात व शहरात बाहेरुन येणाऱ्या वाहनांचे सॅनिटाझिंग तसेच वाहनचालकांची आरोग्य तपासणी.
       पोलीस प्रशासनाकडून चेक नाक्यावर वाहनांची व नागरिकांची कडक तपासणी.

add