खळबळजनक... राज्य उत्पादन शुल्क च्या दुय्यम निबंधकानेच उघडला होता दारूचा गुत्ता... सहारा इन लॉजमधील मद्यविक्रीचा डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी केला पर्दाफाश - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 21 May 2020

खळबळजनक... राज्य उत्पादन शुल्क च्या दुय्यम निबंधकानेच उघडला होता दारूचा गुत्ता... सहारा इन लॉजमधील मद्यविक्रीचा डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी केला पर्दाफाश


Pandharpur Live- लॉकडाऊन काळात पंढरपूर, इसबावी येथील सहारा इन लॉजमध्ये सुरू असलेल्या विदेशी मद्यविक्री च्या गुन्ह्याचा पर्दाफाश पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी  केलाय. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क चा दुय्यम निरीक्षकच येथे दारूचा गुत्ता चालवत असल्याचा खळबळजनक गुन्हा उघडकीस आला आहे. 

याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडून समजलेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांचे आदेशानुसार सपोनी गायकवाड व डी.बी. पथकाच्या कर्मचा-यांनी इसबावी येथील सहारा इन लॉजमध्ये दि. 21-5-2020 रोजी रात्री 1 वाजुन 5 मि. या वेळेत तपासणी केली असता, येथील एका रूममध्ये  मिलींद मधुकर जगताप (वय 49), (दुय्यम निबंधक, राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर) रा.  816, भवानी पेठ,  पुणे हा विदेशी मद्याच्या बाटल्यांसह आढळून आला. 

तात्काळ घटनास्थळी डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी धाव घेतली व अधिक चौकशी केली असता सदर खोलीमध्ये विविध कंपन्यांच्या 13 हजार 438 रूपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या अवैधरित्या विक्रीस ठेवल्याच्या आढळून आल्या.

यासंदर्भात मिलींद जगताप याने कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही. परवाना नसताना विदेशी मद्याचा साठा करून दारूचा गुत्ता उघडण्यास व देखरेख ठेवण्याचे काम युवराज नेताजी पवार, रा. ढोक बाभुळगाव, ता. मोहोळ याला सोपविलेप्रकरणी आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ), 68, 83 प्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.  अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक उमाप हे करत आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART


add