पंढरपूर तालुक्याच्या सोनकेतील ‘त्या’ हातभट्टीवर पोलीसांची पुन्हा एकदा धाड... हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. एमएसईबीची वीज चोरुन पुन्हा सुरु झाला होता हातभट्टीचा धंदा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 4 May 2020

पंढरपूर तालुक्याच्या सोनकेतील ‘त्या’ हातभट्टीवर पोलीसांची पुन्हा एकदा धाड... हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. एमएसईबीची वीज चोरुन पुन्हा सुरु झाला होता हातभट्टीचा धंदा


पंढरपूर Live- ,ता.4ःसोनके (ता.पंढरपूर)येथे एमएसईबीची लाईट चोरुन याचा वापर करुन सुरू असलेल्या अवैध हातभट्टीच्या अड्यावर पोलीसांनी पुन्हा एकदा धाड टाकली. याआधीही एकदा पोलीसांनी येथे कारवाई करत सदर बेकायदेशीर धंदा बंद केला होता; परंतु पुन्हा हा धंदा आरोपींनी सुरु केल्याचे समजल्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीसांनी येथे धाड टाकली व हजारो रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
देशात कोरोणाचे संकट असतानाही येथील बंद केलेला हातभट्टी दारु चा गुत्ता आठ दिवसात पुन्हा सुरू केला होता. कोरोणाच्या महामारीवर देश मात करीत असताना,सर्वत्र दारू विक्रीची दुकाने व बार बंद आहेत. कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. पण कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकार्‍यांनी सोनके येथील हातभट्टीच्या संबंधीत गुत्त्यावर दुसर्‍यांचा धाड टाकुन कारवाई केली आहे. यावेळी पोलिस उपविभागिय अधिकारी डॉ सागर कवडे याचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यापुर्वी धाड टाकल्यानंतर जेरबंद केलेेले पहिले तीन आरोपी सुटले नसतानाही पुन्हा येथे हातभट्टी सुरू केली होती. आरोपी अमोल दीघे(सोनके), दिलीप गायकवाड(पळशी), मोहन दिघे (सोनके), बापू गायकवाड यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक आरोपी घटनास्थळी सापडला असुन तीन अरोपी फरार आहेत. आरोपी भट्टीवर गुळ मिश्रीत रसायने तयार करून दारू तयार करीत होते.घटनास्थळी गुळमिश्रीत रसायन,बँटरी सेल,इलेक्ट्रिक मोटार,वायर,पाईप,युरीया,नवसागर,झाडाची साल,टुब,बँलर,2200 लीटर रसायन (किंमत 22000 हजार) रूपयाचे रसायन नष्ट करण्यात आले तर 7000 हजार रूपये किमंतीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी एमएसइबी चे पोल वरून चोरून लाईट घेवून दारू काढत होते. आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता (1860)328,272,279,34, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949) 65 (अ)(ब)(क)(ड)( ई),(फ)67,83,तसेच भारतीय विद्युत कायदा कलम 135 प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी पोलिस वामन यलमार, भिंगारदेवे,मुलाणी,लोंढे,भोसले,रोंगे,भोसले,हुलजंती, आदीसह पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ सागर कवडे याचे मार्गदर्शनाखाली धाड टाकून हातभट्टी दारू भट्टी उधवस्त केली.खुप दिवसा पासुन सुरू असलेली दारू भट्टी उधवस्त केलेने सोनकेतील महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

add