पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे अवैध दारूधंद्यावर पोलीसांची धाड... हातभट्टी दारूसह मुद्देमाल हस्तगत - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 4 May 2020

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे अवैध दारूधंद्यावर पोलीसांची धाड... हातभट्टी दारूसह मुद्देमाल हस्तगत


तिसंगी - (प्रतिनिधी):-  पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे अवैध दारू बेकायदेशीररित्या विक्री  करीत असल्याचे समजलेने  पोलिसांनी येथे अचानक धाड टाकली तेंव्हा येथे घराच्या बाजूला पत्राशेडमध्ये तानाजी कैलास खंडागळे हा आरोपी 1350 रुपये किमतीची हातभट्टीची दारू, काळ्या प्लास्टिक कॅनमध्ये बेकायदेशीर विक्री करताना आढळुन आल्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भिंगार दिवे  ए. आर पोलिस नाईक विशाल भोसले,पोलिस नाईक निलेश रोंगे,पोलिस हवालदार सुरेश माळी,पोलिस हवालदार वामन यलमार, पोलिस शिपाई राहुल लोंढे, पोलिस शिपाई सिदु मोरे, यांच्या पथकाने केली आहे.

अरोपीला मुद्देमालासह दिनांक 2/5/2020 रोजी रात्री 7:30 वा. ताब्यात घेवून पोलिस कॉन्स्टेबल विशाल भोसले यांच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश पवार हे तपास करीत आहेत.


सदर गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याची गावात व परिसरात दादागिरी वाढली आहे, त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

add