पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील धक्कादायक घटना... आशा वर्कर महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण... आरोपी गजाआड

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन - 
पंढरपूर लाईव्ह- टाकळी, ता. पंढरपूर येथील आशा वर्कर रीमा सतीश झेंडे यांना कर्तव्य बजावत असताना एकाने शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुनवर्सन टाकळी येथे घडली आहे. याबाबत सदर आशा वर्कर महिलेने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


याबाबत पंढरपूर पोलीस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार पुनवर्सन टाकळी येथील लॉकडाऊनपुर्वी पुण्याहून गावी आलेला इसम रामचंद्र दत्तु वाकसे हा सोलापूर येथे कामास जात होता व त्यास सर्दी, खोकला झाला आहे, कोरोना सारखी लक्षणे दिसत आहेत, अशी माहिती समल्यानंतर आशा वर्कर रीमा झेंडे यांनी सदर इसमास देणेसाठी पॅरासिटेनल (सीपीएम) गोळ्या एकजणाकडे ठेवल्या होत्या; परंतु रामचंद्र वाकसे याने या गोळ्या फेकुन दिल्या व गोळ्या फेकुन देत आशा वर्कर झेंडे यांना शिवीगाळ करत , ‘‘सगळ्या गावामध्ये मला कोरोना झालाय म्हणून सांग, बघु माझं कोण काय करतेय’’ असे म्हणाला. आशा वर्कर झेंडे यांनी वाकसे यास शिवीगाळ करु नका, मी सरकारी काम करतेय, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलाय आहे, मी तुम्हाला गोळ्या देते असे  समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु वाकसे याने मी कोन आशा वर्कर ओळखत नाही, असे म्हणत झेंडे यांना खाली पाडुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा मारण्याची धमकी दिली. यावेळी सोडवासोडवी करणार्‍या अन्य दोघांनाही वाकसे याने धमकी दिली. 

ही घटना दि. 21 मे 2020 रोजी दुपारी 12:15 वाजणेचे सुमारास पुनवर्सन टाकळी येथे घडली असुन आशा वर्कर महिलेची फिर्याद तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदवली असुन आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.