पंढरपूर तालुक्यातील सरकोलीत तरुणाचा खून...

Pandharpur Live- 
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे झोपेत असलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालुन त्याचा खुन केल्याची घटना घडली आहे.  संतोष कपणे  (वय 35)  हा तरुण आपल्या घरासमोरच्या अंगणात झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालुन ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समजते. 


घटना समजताच तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, पो नि किरण अवचर यांचेसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

सरकोली ता पंढरपूर येथील संतोष सुरेश कपणे (वय 36) हा दूधव्यवसाय ( गवळी) करीत होता. गुरुवारी संध्याकाळी जेवण करून आपल्या घरासमोरील कट्ट्यावर (रस्त्यावर) झोपला होता. दिवसभर काम करून कंटाळा आल्याने गाढ झोपला असताना मध्यरात्री एक ते दोन च्या दरम्यान दारात झोपलेल्या संतोष च्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने  दगड घालून पसार झाला. 

दररोज पहाटे चार वाजता उठणारा संतोष अजूनही उठला नाही म्हणून त्याची आई  उठवण्यास गेली तेव्हा संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. समोरचे चित्र पाहून आई ओरडली असता घरातील व शेजारील लोक गोळा झाले आणखी जीव असेल या आशेने त्यास उपचारासाठी पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे नेण्यात आले; परंतु डॉक्टरने पाहताक्षणी मयत झाल्याचे घोषित केले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. सदर गुन्ह्याची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असुन पोलीसांनी जागेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव ओलेकर करीत आहे.