शेतकर्‍यांच्या हितासाठी सरसावला डी.व्ही.पी. उद्योग समुह... उद्योजक अभिजीत पाटील यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 11 May 2020

शेतकर्‍यांच्या हितासाठी सरसावला डी.व्ही.पी. उद्योग समुह... उद्योजक अभिजीत पाटील यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय


Pandharpur Live- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सध्या संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातही लॉकडाऊन असल्याने शेतकरी  बांधवांच्या शेतीमालाला मार्केट  उपलब्ध नाही. नाशवंत असलेला शेतमाल विकला जात नसल्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या हितासाठी आता डी.व्ही.पी. उद्योग समुह सरसावला आहे. डीव्हीपी समुहाचे सर्वेसर्वा,  उद्योजक अभिजीत पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.‘डीव्हीपी ई-मार्केट कमिटी अ‍ॅप’ या अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशनची निर्मिती करण्यात येणार असुन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन हे अ‍ॅप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. 
ज्याद्वारे शेतकरी  बांधवांना आपल्या शेतीमालाची विक्री  करणं सुलभ जाईल. 

आपल्या भागातील शेतकर्‍यांना आपला शेतीमाल या माध्यमातुन ऑनलाईन पध्दतीने विकता येईल, पुढील काळात पुणे, मुंबई,  सोलापूर येथील शेतकर्‍यांना या अ‍ॅपमध्ये सहभागी करुन घेतले जाईल. 
हे अ‍ॅप संपुर्णत: मोफत असेल, कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी, शेतीमालाला योग्य भाव मिळवुन देण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणुन हे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन निर्माण केले जाणार आहे. अशी  माहिती उद्योजक अभिजीत पाटील यांनी दिली आहे.   
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

add