चंद्रभागेच्या काठावर इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागुन तरूणाचा मृत्यू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 1 May 2020

चंद्रभागेच्या काठावर इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागुन तरूणाचा मृत्यू


पंढरपूर लाईव्ह- 
 पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतील अहिल्या पुलानजीकच्या चंद्रभागेच्या काठावर  इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून (वय अंदाजे 28)  वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दुश्यंत सुभाष परचंडे (रा. हरिदास वेस, पंढरपूर) हा तरूण आपल्या  शेतातील चंद्रभागेच्या पात्रातील इलेक्ट्रीक  मोटार सुरू करण्यासाठी गेला होता.  मोटार सुरू होत नसल्याने तो  पाण्यामध्ये उतरला असता  शेजारच्याच दुस-या इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागून त्याचा  जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते. घटना समजताच पंढरपूर तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले असुन मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलवल्याचे समजते. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

 मयत तरूण विवाहित असून त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी आणि दोन मुले असा परिवार असल्याचे समजते.

यासंदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 

add