मुथूट फायनान्स कंपनीकडून पंढरीतील गरजु कुटुंबांना अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तुंचे वाटप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 9 May 2020

मुथूट फायनान्स कंपनीकडून पंढरीतील गरजु कुटुंबांना अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तुंचे वाटप


पंढरपूर लाईव्ह- संपुर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपला देशही यामुळे लॉकडाऊन आहे. या काळात हातावरचे पोट असलेल्या अनेक गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होण्यासाठी विविध स्तरातुन प्रयत्न होताना आढळत आहेत. यासाठी आता भारतातील सर्वात मोठी गोल्ड लोन फायनान्स कंपनी मुथूट फायनान्सही सरसावली आहे. या कंपनीच्या वतीने पंढरीतील जुना कराड नाका परिसरातील गरजु कुटुंबांना अन्नधान्य व अत्यावश्यक  वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. 
मुथूट फायनान्स कंपनी पंढरपूर शाखेचे मॅनेजर सुधाकर आठवले, कॅशियर आबासाहेब मोरे यांनी अन्नधान्याचे नियोजन केले. पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बजरंग धोत्रे यांच्या हस्ते येथील जुना कराड नाका परिसरातील गरजु कुटुंबांना अण्नदान्याचे वाटप करण्यात आले.  यावेळी पंचशील मंडळाचे अध्यक्ष आर.पी कांबळे, उपाध्यक्ष नगरसेवक महादेव भालेराव, सेक्रेटरी जितेंद्र बनसोडे, सभासद मोहन कडलाख, मुकुंद मागाडे, मारुती ठोकळे, पोपट क्षिरसागर, संजु शिवशरण आदींसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

भारतातील 1 नंबर गोल्ड लोन फायनान्स कंपनी सध्या संपुर्ण संपुर्ण भारतात गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करत आहे. याच अनुषंगाने आज पंढरपूरमध्ये अन्नधान्याचे वाटप केले. अशी माहिती मुथूट फायनान्सचे पंढरपूर शाखेचे मॅनेजर सुधाकर आठवले यांनी केले. यासाठी पंचशीलमंडळाचे सहकार्य लाभल्याचेही ते म्हणाले.
घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

add