पंढरपूर नगरपरिषदेकडून आरोग्य कर्मचार्‍यांना वॉशेबल पीपई किटचे वाटप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 4 May 2020

पंढरपूर नगरपरिषदेकडून आरोग्य कर्मचार्‍यांना वॉशेबल पीपई किटचे वाटप          Pandharpur Live- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचारींवर मोठी जबाबदारी असते. पंढरपूरातील सर्व नागरिक, दुकानदार , कर्मचारी, भाजीपाला विक्रेत्यांचे थर्मल स्किनीग द्यारे तपासणी करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, नर्सीग स्टाफ यांना नगरपरिषद प्रतिनीधी यांच्या मदतीने करण्यात येतो.        
             नगराध्यक्षा साधनाताई भोसले , मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, मुख्य वैद्यकीय डॉ अधिकारी बजरंग धोत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ सालविठ्ठल यांच्या शुभ हस्ते वॉशेबल पिपीई किट, सॅनिटायझ देण्यात आले.
           आशा वर्कर , ब्रदर, सिस्टर, नगरपरिषद हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांना पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने वॉशेबल पिपीई किटचे 2 सेट देण्यात आले, त्यामध्ये वॉशेबल गाऊन, फेस मास्क (डब्बल लेयर), कँप फळ, गाऊन, सायनेटाईझरची बाटली,प्लास्टिक चे  ऐप्रण, दहा नग ग्लोज याचा समावेश आहे. वॉशेबल पिपीई किट मुळे कर्मचारींची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली सोय होणार आहे. वॉशेबल किट पिपीई अलटरनेट पध्दतीने दररोज परिधान करणे शक्य होणार आहे.
       सदर प्रसंगी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्व कर्मचारींच्या आज परियंत केलेल्या कामाबद्दल समधान व्यक्त केले. पुढील दिवसाचे नियोजन सांगितले. नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी कर्मचारींना नगरपरिषदेच्या वतीने सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतील असे सांगितले व नागरिकांच्या सहभागाने कोरोनाची लढाई जिंकायची आहे असे सांगितले. आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सर्व कर्मचारी यांना सांगितले पुढे आपणास नवनवीन संकटांचा सामना करावा लागु शकतो, अशा संकाटातुन नागरिकांना वाचवण्याची जबाबदारी आपली असून, नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागेल, आम्ही ही तुमच्या मदतीला आहोत , ग्रांउड लेव्हलला आम्ही काम करणार आहोत. आपण सर्वजन मिळुन नागरिकांच्या सहभागाने आपल्या गावाला सुरक्षीत ठेवायचे असल्याचे सांगितले.

add