गरजुंना केले अन्नदान... राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व शिवसेनेच्या वतीने स्तुत्य उपक्रम - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 3 May 2020

गरजुंना केले अन्नदान... राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व शिवसेनेच्या वतीने स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज व जगज्योत महात्मा बसवेश्‍वर महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने व अक्षयतृतीयेच्या निमित्ताने घरोघरी सुग्रास भोजन बनविले जाते; परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर वंचीत घटकांनाही सुग्रास भोजन मिळावे या उद्देशाने अक्षयतृतीयेच्या दिवशी म्हणजेच दि. 26 एप्रिल 2020 रोजी पंढरीतील 150 गरजुंना अन्नदान करण्याचा स्तुत्य उपक्रम शिवसेना महिला आघाडी पंढरपूर तालुका व राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.

                     

  शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ.आरती ओंकार बसवंती (सचिव-राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था) व शिवसेनेचे माजी उप शहरप्रमुख ओंकार बसवंती (संस्थापक अध्यक्ष-राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था) तसेच संदीप केंदळे (उपाध्यक्ष-राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था) यांनी अक्षयतृतीयेच्या दिवशी शिवजयंती व बसवजयंतीच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर हा उपक्रम राबविला. पंढरपूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक, जुना अकलुज रोड या भागात वास्तव्यास असलेल्या हातावरचे पोट असलेल्या 150 गोरगरीब बंधू-भगिणींना एकवेळचे जेवण देण्यात आले,  चपाती, बटाटा भाजी, शिरा, मसाले भात असे सुग्रास भोजन यावेळी देण्यात आले.

                         
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर जेवणाचे वाटप करण्यापुर्वी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांच्या सल्ल्यानुसार रॉबिनहुड संस्थेचे पदाधिकारी यांना सोबत घेवुन हे अन्नदान केले. यावेळी शिवसेना माजी उपशहरप्रमुख नितीन थिटे, शिवसैनिक देविदास धट, शिवसेना महिला उपतालुका प्रमुख सौ.मंदोदरी मुळे, सौ.सुरेखा पवार, सौ.ममता आसबे, आदी उपस्थित होते.   

add