६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य ऑनलाईन लाईव्ह क्लासेस - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 4 May 2020

६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य ऑनलाईन लाईव्ह क्लासेस


~ ब्राईट ट्युटीची सुविधा; युट्युब चॅनेलच्या माध्यमातून करणार शिक्षण प्रदान ~
मुंबई, ४ मे २०२०: देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन शिक्षणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ब्राईट ट्युटी या एडुटेक कंपनीने सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विनामूल्य ऑनलाईन लाईव्ह क्लासेसची सुविधा सुरु केली आहे. यात देशातील विविध शैक्षणिक बोर्डांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असून ब्राईट ट्युटी आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हे क्लासेस उपलब्ध करून देणार आहे.
ब्राइटट्युटी यांनी सुरू केलेले लाइव्ह क्लासेस वर्गनिहाय वेळापत्रकांचे अनुसरण करतात. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी ११ ते ११:४० पर्यंत, ७वीचे वर्ग दुपारी १२ ते १२:४०, तर ८वीचे वर्ग दुपारी १ ते १:४० या वेळेत घेण्यात येतील. याप्रमाणेच ९वी व १०वीचे वर्गदेखील घेण्यात येतील.
ब्राइट ट्युटीचे संचालक आणि संस्थापक अनंत गोयल म्हणाले, 'या महामारीदरम्यान घरी राहूनच शिक्षण उपलब्ध होऊ शकेल हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य वर्ग आयोजित करण्यासाठी युट्यूबसारख्या सोशल मीडिया चॅनेलचा लाभ घेण्याचे ठरविले. आम्हाला आशा आहे की या उपक्रमाचा ६वी ते १०वीच्या वर्गात प्रवेश नोंदविलेल्या १० दशलक्ष विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.'

add