पंढरपूर टॅलेंट स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचा चि.मिहीर बडवे केंद्रात व्दितीय - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 1 May 2020

पंढरपूर टॅलेंट स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचा चि.मिहीर बडवे केंद्रात व्दितीय

बुधवार, दि.०८.०३.२०२० रोजी घेण्यात आलेल्या पंढरपूर टॅलेंट स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील इयत्ता ३ री चा चि.मिहीर बडवे हा केंद्रात दुसरा आला त्याबद्दल प्रशालेतर्फे प्राचार्या, सौ शैला कर्णेकर यांनी त्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या परीक्षेत चि.मिहीर बडवे याने एकूण ३०० गुणांपैकी २६२ गुण मिळवून केंद्रात व्दितीय येण्याचा मान मिळविला. आज स्पर्धा परीक्षांचे युग आहे. यात जो सरस असेल त्याचे भावी आयुष्य सुकर होणार आहे कारण या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कमी वयापासूनच प्रयत्न सुरु असणे फार गरजेचे आहे त्याचीच चुणुक या विद्यार्थ्याने दाखवून दिली. आज विविध राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा आलेख वाढत चालला आहे त्यासाठी अशा राज्यस्तरीय टॅलेंट स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे असुन त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना एक नवे व्यासपीठ निर्माण होणार आहे व त्याचा फायदा आपल्या राज्याला तसेच देशालाही होणार आहे.

यावेळी या यशस्वी विद्यार्थ्याला कौतुकाची थाप टाकून प्रशालेच्या प्राचार्या, सौ शैला कर्णेकर म्हणाल्या की, शालेय अभ्यास करताना विद्यार्थ्यांवर मानसिक ताण पडत असतो तरीही अशा परिस्थीतीत अशा शालेयतर स्पर्धांमध्ये आपला सहभाग  नोंदविणे म्हणजे बुद्धिला आधिकाधिक चालना देवून बौद्धिक वाढ होते म्हणुन मला या विद्यार्थ्याचा फारच गौरव करावासा वाटतो.

प्रशालेतून विद्यार्थ्यांना अशा टॅलेंट स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. यावेळी विद्यानिकेतनचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनीही या विद्यार्थाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री प्रशांत परिचारक यांनी या यशस्वी विद्यार्थी चि.मिहीर बडवे याचे मनःपुर्वक अभिनंदन केले व ते म्हणाले स्वतःबरोबर आपल्या शाळेचाही नावलौकीक केल्याबद्दल त्याचे आभार मानले.

add