कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या इयत्ता २ री ते ७ वी तील विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परिक्षा-२०२० मध्ये उत्तुंग यश” - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 5 May 2020

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या इयत्ता २ री ते ७ वी तील विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परिक्षा-२०२० मध्ये उत्तुंग यश”
६ वीची विद्यार्थिनी कु.कुंभार सानिका गोविंद ही केंद्रामध्ये द्वितीय
रविवार, दि.१९/०१/२०२० रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे व मंथन पब्लिकेशन आयोजित घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत कर्मयोगी विद्यानिकेनच्या इयत्ता 2 री ते 7 वी च्या ६२ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. हे सर्व विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यामध्ये इ. 6 वीची विद्यार्थिनी कु.कुंभार सानिका गोविंद हिने केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. या परीक्षेस इ. 2 रीचे 13 विद्यार्थी, इ. 3 रीचे 13 विद्यार्थी, इ. 4 थीचे सहा विद्यार्थी, इ.5 वी चे 11 विद्यार्थी, इ. 6 वीचे 13 विद्यार्थी तर इ. 7 वीचे सहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी ‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा’ सद्य परिस्थितीत स्पर्धा परीक्षांचे शैक्षणिक जीवनविश्‍व व्यापून टाकले आहे. आजमितीस शिपायापासून तर जिल्हाधिकारी यांच्या पदांपर्यंत स्पर्धा परीक्षा अनिवार्य झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या चाकोरीतून जाणे क्रमप्राप्त झाले आहे.. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा आहे.

राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत राष्ट्रीय स्तर परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले जाते. ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व विषयाच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांनी कौतुक केले व यावेळी त्या म्हणाल्या की, या प्रज्ञाशोध सारख्या परीक्षांमधुनच भविष्यातील उच्च स्पर्धापरीक्षांमध्ये याचा फायदा होवून उद्याचे आयएएस, आयपीएस घडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा बौद्धिक चाचणी स्पर्धांमध्ये आपला सहभाग सतत नोंदविला पाहिजे. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यानिकेतनचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी अभिनंदन केले.

add