“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु” - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 20 May 2020

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु”


Pandharpur Live- श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे जरवर्षी उन्हाळी सुट्टीत विविध छंदवर्ग व शिबीरे घेतली जात असतात. परंतु कोरोना या महामारीमुळे गेले दीड ते दोन महिने ही उन्हाळी वर्ग व शिबीरे ही प्रत्यक्षात घेणे होत नाही म्हणुन याकरीता कर्मयोगी विद्यानिकेतनने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी इयत्ता ३री ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंद वर्ग घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MARTवैश्विक संकट कोरोना विषाणुमुळे दिड ते दोन महिने लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे १५ मार्चपासून राज्यातील सर्वच शाळा बंद असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक इयत्तेसाठी ऑनलाईन छंदवर्ग सुरु करण्यात आले आहेत.

इ.३ री ते १० वीचे वर्ग सकाळी ९ ते दु.१२.४० या वेळेत घेतले जातात. त्याचप्रमाणे छंदवर्ग सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पूर्ण करुन घेतले जातात. या ऑनलाईन छंद वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. याबरोबरच इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, संस्कृत इत्यादी विषय ऑनलाईन शिकविले जातात. त्याचप्रमाणे छंदवर्गामध्ये चित्रकला, संगीत, नृत्य व तायक्वांदो यांचेही ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांना ऑनलाईन वर्ग कशा पद्धतीने घेतले जावेत याचे प्रशिक्षण दिल्यानंतरच त्या-त्या वर्गांचे ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले आहेत. या माध्यमातून सामाजिक अंतर, स्वच्छता व कोरोनासंदर्भात जनजागृती याचा संदेश दिला गेला. या छंदवर्गासाठी प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी नियोजन केले व प्रशालेच्या शिक्षकवृंदांनी याचे कार्य उत्साहात सुरु केले.


add