“कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेजचा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणेसाठी अभिनव उपक्रम”


Pandharpur Live- 
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, सन 2009-10 मध्ये शेळवे येथे स्थापित झालेल्या कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज ने कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कोरोना संसर्ग बद्दलची जनजागृती केली तसेच राज्य शासन व केंद्र शासन यांनी वारंवार दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठीचे ही मार्गदर्शन केले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

कोरोना मुळे निर्माण झालेल्या देशासमोरील आव्हानाला सामोरे जात असताना व सामाजिक बांधिलकी अंगीकारून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन तसेच लॉकडाउन नंतर येणा-या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी ऑनलाइन टिचिंग-लर्निंग च्या माध्यमातून या सत्राचा सर्व अभ्यासक्रम शिकविण्यात आला. या शैक्षणिक पद्धतीत विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवून या शैक्षणिक पद्धतीचे स्वागतच केले आहे.
घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

ऑनलाइन टिचिंग-लर्निंग करताना व्हाट्सअप, झूम क्लाऊड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सिस्को वेबेक्स, गूगल क्लासरूम, गुगल मीट यासारख्या अद्ययावत तंत्र प्रणालीचा वापर करण्यात आला. 

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त असणारी नोट्स, पुस्तके, युट्युब लिंक्स, व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवण्यात आले. प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ शूटिंग करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्रयत्नशील आहेत आणि नजीकच्या काळात प्रात्यक्षिकांचे पण ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न ह्या कॉलेज मध्ये करण्यात येत आहे.

कर्मयोगी कॉलेजचे प्रथम व व्दितीय वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे, जिल्हा रायगड यांच्याशी संलग्न असून या विद्यापीठाच्या परीपत्रकाप्रमाणे प्रथम व द्वितीय वर्षासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या अनुषंगाने दिनांक 11 मे ते 16 मे च्या दरम्यान “मिड
सेमिस्टर एक्झाम” व 25 मे ते 30 मे च्या दरम्यान “कंटीन्यूअस ॲसेसमेंट” करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांची तयारी पूर्ण झाली असून वेळापत्रकाप्रमाणे हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा वेळापत्रकाचे पालन करून सहभाग नोंदवावा तसेच राज्य सरकारचे शिक्षणमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन वरून व आत्तापर्यंतच्या परीक्षेतील गुणांची सरासरी हे लक्षात घेऊन पुढील वर्गात प्रवेश तसेच
पुढील निकाल जाहीर करण्याचे आदेश विद्यापीठाकडून निर्गमित होतील असे वाटते. अंतर्गत मूल्यमापनाच्या होणाऱ्या परीक्षेस विद्यार्थ्यांनी महत्त्व देऊन आपली गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे आव्हान कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी केले.

अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी उपप्राचार्य प्रा. ज.ल. मुडेगावकर विभाग प्रमुख प्रा. ए.टी. बाबर, प्रा.एस. एम.कुलकर्णी,प्रा. डी.बी. शिवपुजे प्रा. आर. जे.  पांचाळ, प्रा. एन.जी. तिवारी, प्रा. डी. व्ही. भोसले तसेच सर्व वर्गाचे वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे कॉलेजचे रजिस्टार गणेश वाळके यांनी सांगितले.
महाविद्यालयात वारंवार राबविण्यात येणारे उपक्रम, आव्हानाला सामोरे जाण्यासाठीची कर्तव्यदक्षता, विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मिळणारा प्रतिसाद या बाबीवर संस्थाअध्यक्ष आ. प्रशांतरावजी परिचारक यांनी समाधान व्यक्त केले आहे आणि सर्वांनी घरी राहून स्थानिक प्रशासन, राज्य शासन व केंद्र शासनास सहकार्य करण्यासाठी आव्हान केले आहे.