स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासावरील ऑनलाईन वेबिनार मध्ये उत्स्फूर्त सहभाग - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 17 May 2020

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासावरील ऑनलाईन वेबिनार मध्ये उत्स्फूर्त सहभाग


Pandharpur Live- 
             पंढरपूर– स्वेरीत सर्वसाधारण परिस्थिती मध्ये नेहमीच शिक्षणपूरक व विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम व मार्गदर्शनपर कार्यक्रम सुरु असतात. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या  मदतीने स्वेरीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेत कुठेही खंड पडू दिलेला नाही. त्या दृष्टीने स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून दि. १६ मे २०२० रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘मोटिवेशन- की टू सक्सेस’ या विषयावर प्रसिद्ध सॉफ्ट स्किल्स ट्रेनर व मोटिवेशनल स्पीकर श्रीकांत सुंदरगिरी यांचा ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारला स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घर बसल्या प्रचंड प्रतिसाद दिला. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी स्वेरीने ऑनलाइन व्हिडिओज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सॉफ्ट कॉपी मधील नोट्स अशा विविध पद्धतीने शैक्षणिक उपक्रम सुरु ठेवलेलेच आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या  व्यक्तिमत्व विकासासाठी देखील उपक्रम सुरु ठेवलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून सुंदरगिरी यांचे मार्गदर्शन सत्र गुगल मिट या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. 

           विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुंदरगिरी यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित अनेक बाबींवर प्रकाश टाकला. त्यामध्ये त्यांनी डोपामाइन डिटॉक्स ही संकल्पना स्पष्ट केली. २१ दिवसांच्या कालावधीत एका विशिष्ट सवयीचा सराव करून जसे कि सकाळी लवकर उठणे, दररोज एक तास व्यायाम करणे, दररोज चांगली पुस्तके वाचणे इ. चांगल्या गोष्टींचा सराव करून स्वतःला तशा नवीन सवयी लावण्याच्या तंत्रावर या सत्रात भर देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वातील उणीवा व त्यांवर मात करण्याचे मार्ग यावर देखील मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले कि, ‘सध्या लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचा आळशीपणा वाढतो आहे. तो आळशीपणा झटकून देऊन आपण आपल्या व्यक्तिमत्व विंकासासाठी नवीन व विधायक सवयी लावून घेतल्या पाहिजेत.’ 


                  स्वेरी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए.ए.मोटे यांच्या समन्वयाने अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज झालेल्या वेबिनार मध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन व्यक्तिमत्व विंकासाच्या संदर्भात प्रश्न विचारले.  या प्रश्नांची सुंदरगिरी यांनी समर्पक उत्तरे दिली. लॉकडाऊनच्या काळात देखील असे विविध उपक्रम आयोजित केल्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

add