'जो वेळेबरोबर चालतो तोच आयुष्यात नेहमी यशस्वी होत असतो.’ - सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 18 May 2020

'जो वेळेबरोबर चालतो तोच आयुष्यात नेहमी यशस्वी होत असतो.’ - सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर

स्वेरीच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना "वेळेचे व्यवस्थापन" या विषयावर शेखर चरेगावकर यांचे ऑनलाईन मार्गदर्शन 

पंढरपूर – स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या वतीने "वेळेचे व्यवस्थापन" या विषयावर  सहकार परिषद (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष  शेखर चरेगावकर यांचे गुगल मीट च्या माध्यमातून शिक्षक –शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्राचा महाविद्यालयातील सुमारे १५० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

कोरोना मुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वेरीने आपली ज्ञानसाधना अखंड सुरु ठेवलेली आहे. स्वेरीमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा विविध उपक्रमांच्या सहाय्याने वैचारिक उदबोधन केले जात असते. त्या दृष्टीने मा.अध्यक्ष चरेगावकर यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या संवादाच्या माध्यमातून त्यांनी वेळेचे अचूक नियोजन व प्रत्यक्ष कार्यपद्धतीत त्याचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली.

मार्गदर्शन करत असताना मा. शेखर चरेगावकर म्हणाले कि, ‘वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. जो वेळेबरोबर चालतो तोच आयुष्यात नेहमी यशस्वी होत असतो. सध्या लॉक डाऊन मध्ये सर्वाना बराच वेळ उपलब्ध झालेला आहे. या उपलब्ध वेळेबद्दल प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. आपण आपल्या कोणत्याही सवयी न बदलता वेळेचे योग्य व्यवस्थापन करू शकतो. आपण वेळ देऊन पैसे मिळवू शकतो पण पैसे देऊन वेळ मिळवू शकत नाही हे वास्तव आहे. कांही लोकांना उपलब्ध वेळेचं काय करायचं हे समजत नाही कारण त्यांनी ध्येय ठरवलेले नसते. आपण गेलेली संपत्ती, ज्ञान इ. परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. वेळेच्या व्यवस्थापनाच्या अभावाने आपण अनेक गोष्टींना मुकत असतो. बदल स्वीकारत पुढे जाणारे लोक यशस्वी होत असतात.’ वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्व सांगत असताना यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  वारेन बफे यांचे उदाहरण दिले जे २८८ कंपन्यांचे मालक आहेत. बफे यांना जेंव्हा एवढ्या सगळ्या कंपन्यासाठी आपण कसा वेळ काढता?असे विचारण्यात आले तेंव्हा त्यांनी उत्तर दिले कि, ‘मी वर्षातून एका कंपनीला फक्त एक तास वेळ देतो. आणि मी मोबाईल आणि कॉम्प्यूटर वापरत नाही.’ वेळेच्या व्यवस्थापनाचे आठ घटक व त्यासाठीच्या लागणाऱ्या वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करताना मा. चरेगावकर पुढे म्हणाले कि, ‘आपण, झोप-६ तास, जेवण- १ तास, व्यायाम-१ तास, वाचन-१ तास, करमणूक- १ तास, कुटुंबासाठी-१  तास, अध्यात्म व मनशांती- १ तास, अंघोळ वगैरे-१ तास आणि राहिलेला वेळ उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या कामासाठी द्यावा आणि आपला वेळ कुठे वाया जातो ते देखील आपण शोधले पाहिजे व वेळेचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.’ या वेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. हे मार्गदर्शन सत्र यशस्वी होण्यासाठी प्रा.एम.एम.भोरे यांनी परिश्रम घेतले. सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आपण https://www.facebook.com/743091249086604/posts/3226835407378830/ या लिंक वर क्लिक करून आपल्या फेसबुक अकाऊंटच्या सहाय्याने पाहू शकता.

add