स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर कडून ‘अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा’ व ‘प्लेसमेंट मार्गदर्शन’ बाबतच्या ऑनलाईन वर्गांना सुरुवात - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 20 May 2020

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर कडून ‘अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा’ व ‘प्लेसमेंट मार्गदर्शन’ बाबतच्या ऑनलाईन वर्गांना सुरुवात


Pandharpur Live- 
पंढरपूर: महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेवटचे वर्ष सोडून इतर वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुढील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने महाविद्यालयाच्या  सर्व विभागातील अनुभवी प्राध्यापकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची विविध अॅप्लीकेशन्सच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी करवून घेणे काल दि. १८ मे पासून सुरु झाले आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक विभागाचे ८० टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

यापूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर AICTE, DTE आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,  सोलापूर यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वेरीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विषयांनुसार व प्रकरणानुसार व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स,  कॉन्फरन्सिंग द्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद, त्यांच्या शंकांचे निरसन या बाबींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप ग्रुप बनवून त्यांना स्टडी मटेरियल पाठवले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ चॅनल तयार करून यु-ट्यूब द्वारे मार्गदर्शन करण्याचे कार्य देखील सर्व शिक्षक घर बसल्या करत आहेत.

स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पी.एम.पवार तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए.ए.मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक या स्पर्धा परीक्षांबाबतच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रक्रियेत कार्यरत आहेत. सदर प्रशिक्षण प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात जाणाऱ्या, द्वितीय वर्षातून तृतीय वर्षात जाणाऱ्या व तृतीय वर्षातून शेवटच्या वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले  आहे.

 या प्रशिक्षणामध्ये भाषिक क्षमता (इंग्लिश), गणित, अॅप्टीट्युड तसेच विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी च्या शाखेनुसार विविध विषयांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामधून  विद्यार्थ्यांची एमपीएससी, यूपीएससी, आरआरबी, आयईएस अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेतली जाते. स्वेरीने यापूर्वी आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या प्रशिक्षणामधून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. कांही विद्यार्थी GATE परीक्षेत यश मिळवून आयआयटी, एनआयटी अशा संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत तर कांही विद्यार्थी सिंचन विभाग, पोलिस विभाग, आरटीओ, रेल्वे विभाग इत्यादी क्षेत्रात सरकारी नोकरीत सामील झाले आहेत तसेच कांही विद्यार्थ्यांना एमएस साठी जर्मनी व इतर देशात  प्रवेश मिळालेला आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागते.  स्वेरीने लॉकडाऊन च्या काळात देखील विद्यार्थीहित लक्षात घेऊन हे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केल्याने विद्यार्थी व पालकांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.

add