पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वेबिनार उत्साहात संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 20 May 2020

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वेबिनार उत्साहात संपन्न


Pandharpur Live- l
○ ऑनलाईन वेबिनार मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या पसंती असलेले गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारे एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART
संपूर्ण देशात सद्या कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत ग्रामिण व शहरी भागातील महाविद्यालयांना सुट्या आहेत. या सुट्टीच्या कालावधीत म्हणजे लाॅकडाऊन कालावधीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकासासाठी घरी राहूनच सोशल मिडिया च्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास तसेच सर्वांगीण विकासासाठी दिनांक १३ मे २०२० रोजी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घरी राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

   पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. सुभाष लेंगरे यांनी ऑनलाईन वेबिनार मध्ये उत्कृष्ट व्यावसायिक आणि उद्योजक तज्ञांकडून ऑनलाईन झूम, वेबएक्स अँप वर आधारित वेबिनारांची मालिका आयोजित करण्यात आली होती. हे वेबिनार विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी, नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी, आगामी कॅम्पस ड्राईव्हची पूर्वतयारी करण्यासाठी तसेच जगातील नामांकित कंपन्या मध्ये नोकरी, शासकीय क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी फायदा होईल खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास या वेबिनार समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.


  लाॅकडाऊन च्या कालावधीत ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी घरी राहून सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालय विविध उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातुन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.     हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समिर कटेकर यांनी परिश्रम घेतले.

add