लाॅकडाऊन च्या कालावधीत सिंहगडमध्ये ऑनलाईन कोर्सेस


Pandharpur Live ll- 

○ पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांसाठी ३८०० हून अधिक कोर्सेस उपलब्ध

              कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने ३८०० हून अधिक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली.
              संपूर्ण देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये तसेच त्यांना घरी राहूनच सुट्टीच्या कालावधीत विविध कोर्सेसचे शिक्षण घेता यावे यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जवळ-जवळ ३८०० इतके कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हे कोर्सेस खुप महत्वपूर्ण ठरणार आहेत.
    Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस घरबसल्या शिकता येणार या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना कोर्सइरा या ऑनलाईन वेबसाईट वर उपलब्ध आहेत. या कोर्सेसचा सिंहगडच्या विद्यार्थ्यांना खुप मोठा फायदा होत असुन विद्यार्थ्यांच्या बरोबरच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा अध्यापनासाठी विविध प्रकारचे कोर्सेस लाॅकडाऊन च्या कालावधीत शिकत आहेत.
                 पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या अंगभुत कौशल्याचा उपयोग करिअरसाठी व्हावा तसेच विद्यार्थ्यांना स्वतःचा रिझूम व्यक्तीमत्व विकास उत्तम प्रकारे घडवायचे असेल तर त्यांनी  कोर्सइरा सारखे कोर्सेस करणे खुप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना संचार बंदी च्या कालावधीत घरी बसुन विविध कोर्सेस उपलब्ध करून दिल्याने महाविद्यालयाचे विद्यार्थी व पालक वर्गातुन कौतुक होतं आहे. हे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. दिपक कोष्टी परिश्रम घेत आहेत.